शाळा दिवाळीनंतर सुरु – सरकारचा निर्णय
गेल्या अनेक दिवसांपासून शाळा कधी सुरु होणार याची वाट सर्व विद्यार्थी पाहत होते. अखेर दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा घेतला आहे. 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरु होणार आहे. शाळा सुरु करत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार शाळा टप्प्याटप्प्याने सुरु होणार आहेत. पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावी या इयत्तांचे वर्ग सुरु होतील असे सांगण्यात आले आहे.
वर्ग एक सुरुवातीला एक दिवसाआड असे भरतील. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल. विद्यार्थ्यांची शाळेमध्ये दररोज तपासणी करण्यात येईल. शाळा चार तास असेल. या चार तासांत शक्यतो विज्ञान, गणित आणि इंग्रजी सारख्या अवघड विषयांचे तास सुरुवातीला होतील. शाळा सरू होण्याआधी सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे.