इयत्ता दहावी – विषय मराठी – बातमी लेखन
इयत्ता दहावी – विषय मराठी – बातमी लेखन
बातमी लेखनासाठी आवश्यक गुण-
(१) लेखन कौशल्य
(२) भाषेचे उत्तम ज्ञान
(३) व्याकरणाची जाण
(४) सोपी, सुटसुटीत वाक्यरचना
(५) समग्र वाचन.
कोणत्याही घडलेल्या घटनेची बातमी तयार करताना खालील गोष्टींचे भान राखणे महत्त्वाचे असते.
(१) घटनेची विश्वासार्हता.
(२) तटस्थ भूमिकेतून लेखन.
(३) घटनेचा अचूक व योग्य तपशील.
(४) प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्त्वाचे.
(५) स्वत: च्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये
बातमी तयार करण्याचे निकष
(१) शीर्षक- बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा/घटनेचा आरसा असतो.
(२) दिनांक, स्थळ, कालावधी संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असावा.
(३) घटना घडण्याच्या स्थितीप्रमाणे बातमीलेखनात काळाचा वापर केला जातो.
(४) जनक्षोभ वाढेल, कुणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वाक्ये/शब्द बातमीत नसावेत असे संकेत आहेत.
(५) बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा.
बातमी तयार करणे-मूल्यमापन कृती :
(१) दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे.
(२) दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे.
(३) कार्यक्रमाची बातमी तयार करणे.