राज्यशास्त्र – प्रकरण 2 रे – निवडणूक प्रक्रिया
दहावी राज्यशास्त्र – प्रकरण 2 रे – निवडणूक प्रक्रिया | Notes and Online test
ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा. तसेच अधिक माहितीसाठी या लिंक सोबत दिलेल्या नोट्स तुम्ही वाचू शकता.
https://forms.gle/UY7ih4P7Fo871yEU8
निवडणूक आयोग
भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी निवडणूक आयोग आहे. भारतीय संविधानाच्या कलम ३२४ ने या स्वयात्य यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन अन्य निवडणूक आयुक्त असतात. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते.
निवडणूक आयोगाची कामे
- मतदार याद्या तयार करणे
- निवडणुकांचे वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम ठरवणे
- उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे
- राजकीय पक्षांना मान्यता देणे
- निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे
- मतदार संघाची पुनर्रचना करणे
आचारसंहिता म्हणजे काय?
भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यात आचारसंहिताचा समावेश करता येईल. गेल्या काही दशकापासून निवडणूक आयोगाने आपले सारे अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.