दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या | लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर होणार
लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर होणार
मुसळधार पावसामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. बुधवार १९ जुलै रोजी मुंबई विद्यापीठातंर्गत विद्यापीठातंर्गत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडल्या पण पावसामुळे रायगड जिल्ह्यातील काही महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा २२ जुलै रोजी त्याच परीक्षा केंद्रावर होणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या द्वितीय भाषा या एनएसक्यूएफमधील हिंदी आणि समाजशास्त्र या विषयातील परीक्षा असून, या परीक्षेला राज्यभरातून केवळ ४१ विद्यार्थी बसणार होते, तर दुसरीकडे बारावीच्या द्वितीय भाषा या विषयातील मराठी, उर्दू हिंदी आदी विषयांची परीक्षा असून, या परीक्षेला राज्यभरातून आठ हजारांहून अधिक विद्यार्थी बसणार होते.
राज्यातील एकूण अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवारी सकाळपासूनच रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक भागात पाणी साचल्याने येथील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबई विद्यापीठातंर्गत महाविद्यालयीन परीक्षा सुरू असून या पावसाचा फटका परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना बसला. विविध विद्याशाखांच्या ९ परीक्षा बुधवारी दिवसभर होत्या. या परीक्षांना अनेक विद्यार्थी पावसामुळे परीक्षाकेंद्रावर पोहोचू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी २२ जुलैला पुन्हा परीक्षा घेतली जाईल तसेच जे विद्यार्थी बुधवारी (१९ जुलै) परीक्षेला हजर होते. त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची आवश्यकता नाही, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद करंडे यांनी स्पष्ट केले.