दहावी बारावी बोर्ड परीक्षा – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज काय म्हणाल्या
दहावी बारावी बोर्ड परीक्षा – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज काय म्हणाल्या
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परीक्षेत दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात आज मांडलेले महत्वाचे मुद्दे तसेच बारावीची परीक्षा 23
1) दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा नियोजित वेळेतच होणार
2) दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे तसेच बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मी दरम्यान होणार.
3) बोर्डाची परीक्षा ही ऑफलाईनच होणार. परीक्षा ऑनलाई होणे अशक्य.
4) यावर्षी परीक्षेची वेळ ही वाढवून मिळणार. 80 गुणांच्या पेपर साठी दरवर्षी 3 तास असतात. यावर्षी अर्धा तास वाढवून साडेतीन तास असेल. 40 ते 50 गुणांच्या पेपर साठी 15 मिनिटे वाढवून मिळणार.
5) दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी एका तासामागे 20 मिनिटे वाढवून मिळणार.
6) प्रक्टिकल परीक्षेऐवजी यावर्षी विशेष लेखन कार्य किंवा संबंधित विषयासाठी गृहपाठ दिले जाईल. हे विशेष लेखन कार्य किंवा संबंधित विषयासाठी गृहपाठ दिले गेलेले गृहपाठ दहावीच्या विद्यार्थ्यांनी 21 मे ते 10 जून दरम्यान आपल्या शाळेत जमा करावे. बारावी मधील विद्यार्थ्यांनी 22 मे ते 10 जून या कालावधीत आपल्या जमा करावे.
7) बारावी सायन्सच्याच विद्यार्थ्यांसाठी practical परीक्षा होईल परंतु practical साठी फक्त 5 ते 6 असाईनमेंट असतील.
8) विशेष लेखन कार्य किंवा संबंधित विषयांचा गृहपाठ सादर करण्याच्या काळात जर एखाद्या विद्यार्थ्याला कोरोना ची लागण झाली तर विशेष लेखन कार्य किंवा संबंधित विषयाचे गृहपाठ सदर करण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.
9) एखाद्या विध्यार्थ्याला कोरोनाची लेखी परीक्षेच्या काळात लागण झाली तर अशा विद्यार्थ्यांसाठी जून मध्ये विशेष परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा शहरी भागात विशेष केंद्रात तर ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी होईल.
10) पुरवणी परीक्षा जी बोर्डाच्या परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असते ही परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होईल.
11) परीक्षा केंद्र ही तुमची शाळा आणि कनिष्ट महविद्यालय असेल.
१२) ३५% ला पास असेल.
१३) सुरक्षिततेचे नियम पळून परीक्षा होईल.
14) विश्वसनीय माहितीसाठी बोर्डाच्या संकेतस्थळालाच भेट द्यावी.