दहावी – बारावी बोर्डाची परीक्षा झाली आता निकाल कधी लागणार – लवकर की उशिरा
दहावी – बारावी बोर्डाची परीक्षा झाली आता निकाल कधी लागणार – लवकर की उशिरा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा नुकात्याच संपलेल्या आहेत. कोरोनाच्या प्रदीर्घ अडथळ्यानंतर शेवटी संपूर्ण अभ्यासक्रमवार यावर्षी परीक्षा झाल्या. परीक्षा सुरु असतानाच शिक्षकांनी पेन्शनसाठी केकेल्या संपामुळे पेपर तपासणी थांबली असून निकाल उशिरा लागण्याची शक्यता असेल अशा बातम्या आपण पेपर सुरु असतानाच ऐकल्याही असतील.
परंतु तरीही निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा असणार आहे. वेळेवर म्हणजे नेमका कधी निकाल लागेल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
तर मित्रांनो दरवर्षी इयत्ता बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात लागत असतो तर इयत्ता बारावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागत असतो. याच वेळेवर यावर्षी चे इयत्ता दहावीचे निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.