ऐन परीक्षेच्या तोंडावर बोर्डाचा मोठा निर्णय | दहावी बारावी बोर्ड परीक्षा २०२३
महराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून यावर्षी २१ फेब्रुवारी पासून तर इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु होत आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत कॉपी चे प्रमाण आणि पेपर फुटीच्या घटनांची संख्या वाढत आहे. यामुळे बोर्डाकडून यावर्षी कॉपी ची प्रकरणे रोखण्यासाठी बोर्डाने कठोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. यासाठी बोर्डाने आत्तापर्यंत अनेक नवीन निर्णय घेतले आहे.
दरवर्षी दहावी बारावी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना बोर्डाची प्रश्नपत्रिका ही पेपर सुरु होण्याच्या १० मिनिटे अगोदर वाचण्यासाठी मिळत होती. परंतु यावर्षीपासून हा निर्णय बोर्डाकडून रद्द करण्यात आलेला आहे. यावर्षी म्हणजे मार्च – फेब्रुवारी २०२३ च्या बोर्ड परीक्षेपासून या निर्णयात बदल केला असून यावर्षी प्रश्नपत्रिका ही वेळेवरच मिळणार आहे. असे बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे.
बोर्डाच्या परीक्षेत कॉपी रोखली जावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.