दहावी बारावी बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
दहावी बारावी बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
17 नंबरचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु
दहावीसाठी लिंक
बारावीसाठी लिंक
महाराष्ट्र राया माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळा कडून घेतली जाणारी दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च आणि एप्रिल मध्ये होत असते. ही परीक्षा देण्यासाठी बाहेरून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अर्ज करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. १६ सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थी इयत्ता दहावी आणि बारावी चे 17 नंबरचे फॉर्म भरू शकतात.
हे फॉर्म विद्यार्थ्यांना online पद्धतीने भरायचे आहेत. तसेच प्रवेश शुल्क हे सुद्धा online पद्धतीनेच विद्यार्थ्यांना भरता येईल. हे प्रवेश फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना आपला शाळा सोडल्याचा दाखला. आधीच्या वर्गाचा निकाल तसेच आधार कार्ड आणि पासपोर्ट साईझ फोटो असणे गरजेचे आहे. या फॉर्म साठी इयत्ता दहावीसाठी ११०० आणि बारावीसाठी ६०० रुपये प्रवेश शुल्क असणार आहे.