दहावी बारावी बोर्ड परीक्षा अपडेट | कॉपी रोखण्यासाठी बोर्डाकडे आल्या तब्बल २३७ कल्पना
दहावी बारावी बोर्ड परीक्षा अपडेट | कॉपी रोखण्यासाठी बोर्डाकडे आल्या तब्बल २३७ कल्पना
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बोर्ड परीक्षा २०२३ च्या परीक्षेत या वर्षी कॉपी रोखण्यावर बोर्डाने खूप जास्त भर दिलेला आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार करताना आढळून येतात. यावर उपाययोजना करण्यासाठी बोर्डाने या महिन्यात विद्यार्थी पालक आणो शिक्षक तसेच समाजातील इतर घटकांकडून बोर्ड परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर काही सूचना आणि आयडिया मागवल्या होत्या. २० जानेवारीपर्यंत बोर्डाकडे जवळपास २३७ आयडिया विविध माध्यमातून मिळाल्या आहेत.
या मिळालेल्या आयडिया ची आणि कल्पनांची एका तज्ञ समितीकडून लवकरच छाननी करण्यात येईल आणि या मधून निवडलेल्या निवडक कल्पनांची अंमलबजावणी या वर्षी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत केली जाईल. त्यामुळे यावर्षी कॉपी चे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
मागील काही वर्षापूर्वी सुद्धा बोर्डाने कॉपी रोखाण्य्साठी काही उपाययोजना केलेल्या होत्या. २०११ रोजी बोर्डाने २६ जानेवारी रोजी ‘मी गैरप्रकार करणार नाही’ अशी शपथ विद्यार्थ्यांकडून घेतली होती आणि कॉपी रोखण्यासाठी जागृती केली होती.
दरवर्षी बोर्ड परीक्षेच्या वेळी भरारी पथके आणि बैठी पथके कॉपी रोखण्यासाठी सज्ज असतात. यावर्षी सुद्धा अशाप्रकारची भरारी पथके कॉपी रोखण्यासाठी सज्ज असणार आहेत. तसेच यावर्षी पेपर सुरु असताना जे शिक्षक वर्गात परीक्षक म्हणून उपस्थित असतील त्यांच्या मोबाईल मध्ये झूम कॅल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तीन तास व्हिडियो रेकॉर्डिंग सुद्धा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.