दहावी गणित भाग 1 आणि 2 चा आणखी कमी झालेला अभ्यासक्रम
दहावी गणित भाग 1 आणि 2 चा आणखी कमी झालेला अभ्यासक्रम
लॉकडाऊन मुले महाराष्ट्र बोर्डाने सर्व शैक्षणिक वर्गांचा अभ्यासक्रम 25% कमी केलेला आहे. पुन्हा मागील महिन्यात इयत्ता दहावी आणि नववी गणित या विषयाचा अभ्यासक्रम आणखी कमी करण्यात आलेला आहे. याची pdf तुम्ही खालील बटनावर क्लिक करून डाऊनलोड करू शकता
नवीन सुधारित परिपत्रकानुसार इयत्ता दहावी इयत्तेचा आणखी अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. यात गणित भाग 1 या विषयाचे अर्थनियोजन आणि सांख्यिकी ही दोन्ही प्रकरणे पूर्णपणे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे. गणित भाग 2 मधील महत्त्वमापन हे प्रकरण पूर्णपणे वगळण्यात आलेले आहे. तसेच आणखी बऱ्याच प्रकरणांमधील काही भाग वगळण्यात आलेला आहे. या भागावर परीक्षेला प्रश्न विचारले जाणार नाहीत परंतु स्वअध्ययनासाठी हा भाग ठेवण्यात आलेला आहे. https://www.maa.ac.in/ या राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेच्या संकेत स्थळावर जावून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता