दहावी बोर्ड प्रश्नपेढी उत्तरे व्हिडियो – विषय गणित
दहावी बोर्ड प्रश्नपेढी उत्तरे व्हिडियो – विषय गणित
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्डाने आपल्या वेबसाईट वर सर्व विषयांची प्रश्नपेढी अपलोड केली आहे. या वर्षी विद्यार्थ्यांचा बोर्ड परीक्षेसाठी सराव कमी झालेला आहे तसेच बऱ्याच शाळांमध्ये अजून पूर्व परीक्षा सुद्धा झाल्या नाही त्यामुळे बोर्डाने आपल्या वेबसाईट वर मुलांचा सराव अधिक चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून बोर्डाने आपल्या संकेतस्थळावर प्रश्नपेढी अपलोड केली आहे. यातील गणिताच्या प्रश्नपेढीच्या उत्तरांच्या व्हिडियो खालीलप्रमाणे आहेत.
गणित भाग 1
प्रकरण 1 – दोन चलांतील रेषीय समीकरणे
इतर व्हिडियो लवकरच अपडेट करण्यात येतील
लवकरच आपण गणित भाग 2 च्या प्रश्नपेढीची उत्तरे याच लिंक वर अपडेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हि लिंक आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. गणित भाग 1 चा विचार केला तर या भागात यावर्षी आपल्याला सर्वच प्रकरणांचा अभ्यास करायचा नाही. फक्त पुढील चार प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. दोन चलांतील रेषीय समीकरणे, वर्गसमीकरणे, अंकगणिती श्रेढी आणि संभाव्यता.