आठवी गणित – प्रकरण 1 ले
आठवी गणित – परिमेय व अपरिमेय संख्या – नोट्स आणि विडीयो
परिमेय व अपरिमेय संख्या
महत्वाच्या संकल्पना – नोट्स आणि विडीयो
संकल्पना – नोट्स
नैसर्गिक संख्या: रोजच्या व्यवहारात आपण या प्रकारच्या संख्यांचा वापर करत असतो. ज्या संख्यांच्या संचाची सुरुवात एक पासून सुरू होते. उदा. 1,2,3,4,…
पूर्ण संख्या : 0 आणि नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्यांचा संच तयार होतो. उदा. 0,1,2,3,…
पूर्णांक संख्या : पूर्ण संख्यांचा संच आणि सर्व ऋण संख्यांचा संच मिळून पूर्णांक संख्या तयार होतात उदा. …,-3,-2,-1, 0, 1, 2, 3,
सम संख्या : ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो अशा संख्यांना सम संख्या म्हणतात. उदा. 0,2,4,6,…
विषम संख्या : : ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही अशा संख्यांना विषम संख्या म्हणतात. उदा. 1,3,5,…
मूळ संख्या : ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने आणि 1 नेच निश्चित भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. उदा. 2,3,5,…
संयुक्त संख्या : मूळ नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. उदा.4,6,8,9…
विडीयो
सरावसंच 1.1 –
सरावसंच 1.2 –
सरावसंच 1.3 –
सरावसंच 1.4 –