दहावी बारावी बोर्ड कायम राहणार | नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
गेल्या अनेक दिवसांपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी खूप चर्चा सुरु आहे. नवे शैक्षणिक धोरण आल्यापासून वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळी चर्चा होत असताना दिसत आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द होईल अशाप्रकारच्या बातम्या सुद्धा आपण ऐकल्या असतील आणि अशाप्रकारच्या खूप साऱ्या चर्चाही झाल्या.
परंतु या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. कारण येणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कायम राहणार असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे सल्लागार डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव शिक्षा मंत्रालय केले आहे. प्रत्येक राज्य, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांनी नवीन शैक्षणिक धोरण राबविताना चांगल्या गोष्टी करण्यास सुरुवात केल्याचे डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले,
धोरणाच्या अमलबजावणीत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्ये पुढे असल्याचे सांगून डॉ. सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्राने नवीन शैक्षणिक धोरण अमलबाजवणी समिती स्थापन केली आहे. हे धोरण राबविण्यासाठी 15 वर्षांचा कालावधी ठरविला आहे. आता दोन वर्षे पूर्ण झाली असून पुढील काळात नवीन बदल होत राहतील