नववी गणित 1 | संच | चाचणी क्र. 1 | महत्वाच्या संकल्पना
नववी गणित 1 | संच | चाचणी क्र. 1 | महत्वाच्या संकल्पना
चाचणी | online टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. परंतु तुम्ही चाचणी देण्याच्या अगोदर लिंक च्या खालील माहिती (Notes) वाचा जेणेकरून चाचणी सोप्पी जाईल.
https://forms.gle/CHj6Cw7FA71UBvUj8
मित्रांनो, आपल्याला समूह म्हणजे काय हे माहीतच आहे. आता हे समूह वेगवेगळ्या प्रकारचे असतात. क्रिकेट चा संघ असतो. चाव्यांचा जुडगा असतो पक्षांचा थवा तर फुलांचा गुच्छा असतो. आता संच म्हणजे काय तर वस्तूंचा सुस्पष्ट समूह. म्हणजे वस्तूंच्या सुस्पष्ट समूहाला संच म्हणतात अशी आपण संचाची व्याख्या करू शकतो.
खालील समूहाचे निरीक्षण करा.
- आठवड्यातील वारांचा समूह
- वर्षातील महिन्यांचा समूह
- आवडत्या शिक्षकांचा समूह
- माझा आवडता वार
वरीलपैकी क्रमांक 1 व 2 चे समूह हे संच आहेत कारण हे समूह स्पष्ट आहेत. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे प्रत्येकजण सारखीच देऊ शकतो. म्हणजे हे समूह स्पष्ट आहेत म्हणून आपण यांना संच म्हणू शकतो. परंतु क्रमांक 3 व 4 चे समूह हे स्पष्ट नाहीत आणि या समूहांची उत्तरे प्रत्येक व्यक्ती किंवा विद्यार्थी वेगवेगळी देऊ शकतो. म्हणून हे समूह संच नाहीत.
संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत.
- यादी पद्धत
- गुणधर्म पद्धत
यादी पद्धतीमध्ये आपण आपल्या संचातील घटकांची यादी बनवत असतो. म्हणून या प्रकारच्या संच लिहिण्याच्या पद्धतीला यादी पद्धत असे म्हणतात. उदाहरणार्थ –
A = {रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार}
गुणधर्म पद्धतीत आपण वेळ वाचवा म्हणून विशिष्ट गुणधर्म वापरून संच लिहित असतो उदाहरणार्थ –
B = {x/x हा आठवड्यातील वार आहे}
महत्वाचे : संच नेहमी महिरपी {} कंसात लिहिला जातो कृपया इतर प्रकारच्या कंसाचा वापर संच लिहिताना करू नये.