गणिताची रे किमया न्यारी – गणितावर कविता
गणिताची रे किमया न्यारी | पण जातो डोक्याच्या वरी ||
तुम्ही सांगा मी शिकू कशी | संख्यांची रे हि दुनियादारी ||
बेरीज वजा जमतात मला | गुणाकाराच्या क्रीयेपरी ||
भागाकार करतो कसा तरी | पण जातो डोक्याच्या वरी ||
गणिताची रे किमया न्यारी | पण जातो डोक्याच्या वरी ||
पाढे पाठ मी केले जरी | विसरतो आल्यावरती घरी ||
आता सांगतो गंमत मी खरी | वजा पेक्षा बेरीजच बरी ||
वजा शिकवा मला कोणीतरी | तो जातो डोक्याच्या वरी ||
गणिताची रे किमया न्यारी | पण जातो डोक्याच्या वरी ||
आहे पडला विश्वास जरी | शिकावा गणित मला कोणीतरी ||
ऐकून ऐकून दमलो मी आता | गणित जातो डोक्याच्या वरी ||
आता सोडवेल गणित मी घरी | नाही जाणार डोक्याच्या वरी ||