मराठी निबंध : माझी मातृभाषा
मराठी निबंध : माझी मातृभाषा | माझी मराठी मातृभाषा निबंध
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’
या कवितेतील ओळी खरंच सांगून जातात की आमचं भाग्य आहे की आम्ही मराठी भाषा बोलतो. जि भाषा ज्ञानेश्वर माऊलींच्या ही ओठांतून वाहत होती, जि भाषा तुकारामांनी बोलली ज्या भाषेतून छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची शपथ घेतली अशी महान अशी मराठी भाषा बोलताना आम्हाला खूप अभिमान वाटतो.
खरे पाहता भारत कमळाच्या फुलाप्रमाणे आहे. जशा कमळाला अनेक पाकळ्या असतात तशा भारतात मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ, हिंदी अशा विविध २२ भाषा भारताच्या विभिन्न राज्यात बोलल्या, लिहिल्या जातात. परंतु प्रत्येकजण आपली मातृभाषा मातृभाषि संपन्न करत इतर भाषांतुनही एकमेकांशी संवाद साधतो. प्रत्येकाला आपली मातृभाषा मधाहूनही गोड वाटते. त्यातील गोडवा आणि लज्जत त्या भाषेतील गोडी चाखण्याने वाढते.
आपणास ज्ञान वाढवायचे असेल तर आपल्या मातृभाषेतील विविध साहित्य वाचावे असे शिक्षण तज्ञांनी ही म्हटले आहे. त्यामुळे आपल्याला समजलेल्या ज्ञानाचा अविष्कार मातृभाषेतून करणे सोईचे होते . आपण आपली मातृभाषाच नीट उमजू शकलो नाही तर इतर भाषांचे आकलन कसे होणार ? मायबोलीचे व्याकरण, शुद्धलेखन समजणे जसे आवश्यक आहे, तसेच थोर साहित्यिकांच्या साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी वाडःमयाचे आकलन होण्यासाठी आपली मायबोली समृद्ध असायला हवी. आपले व्यक्तीमत्व सुधारण्यासाठी भाषेचे संपूर्ण ज्ञान असायला हवे. वसुधैव कुटुंबकम् सारी पृथ्वी हे माझेच कुटुंब आहे एवढी व्यापक दृष्टी भारतीयांना देणा-या संत ज्ञानेश्वरांना सुद्धा मायबोलीचा रसाळपणा भावला म्हणूनच त्यांनी म्हटले आहे. खेड्यापाड्यातील मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अप्रभंश असलेली आसते. कशीही असो ती मराठी माणसाला आवडतेच.
माझ्या मराठीची बोलू कौतुके
परि अमृताहुनी पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिका मेळविन..
अशी ही अमृताहूनी रसाळ बोली सर्वांनाच प्रिय आहे.