माझा देश – भारत देश
जहा डाल डाल पे सोनेकी चिडिया करती है बसेरा
वह भारत देश मेरा, वह भारत देश मेरा
विविधतेने नटलेला देश म्हणजे माझा भारत देश. येथे जात, धर्म, पंथ, भाषा, पोशाख जरी मैला मैलांवर विविध असला तरी या विविधतेमधून माझ्या देशाने एकता टिकवली आहे. उत्तरेला हिमालय पर्वत भारत देशाचे रक्षण करत असून दक्षिणेला हिंदी महासागर जणू भारतमतेच चरण स्पर्श करत आहेत. म्हणूनच एका गीतात म्हंटले आहे की,
उत्तर मे रखवाली करता पर्वत राज विराट है
दक्षिण मे चरणो को धोता सागर का सम्राट है
एकेकाळी माझ्या देशातून सोन्याचा धूर निघायचा आणि सोन्याचा पक्षी या देशात गीत गात असे असं म्हंटल जायचं. परंतु नंतर अनेक वर्ष आपला देश मोठ्या गुलामगिरीत अडकला. या गुलामगिरीच्या बेड्या 15 ऑगस्ट 1947 साली तुटून पडल्या आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून लाल किल्ल्यावर भगवा फडकला. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरू झाले आणि पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद. सर्वात मोठी लोकशाही असलेला देश निर्माण झाला भारत. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारत देशाचा कारभार संविधानानुसार चालवला जाऊ लागला म्हणून दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी आपण गणराज्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आपल्या देशाची राज्यघटना ही खूप विस्तृत आणि जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे.
भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्राशाशित प्रदेश असून दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे. भारतात 19500 हून अधिक भाषा आणि बोलीभाषा बोलल्या जातात. इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या संख्येत सुद्धा आपला देश सर्वात पुढे आहे. भारतानेच जगाला शून्य दिला म्हणून आज जगात एवढी प्रगती झाली. आज एकविसावे शतक सुरु आहे या शतकात तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपला देश खूप पुढे गेला आहे. पहिल्या प्रयत्नात मंगळ ग्रहावर मंगळयान पाठवणारा भारत देश हा जगातील पहिला देश बनला आणि मंगळयान पाठवणारा पाचवा देश बनला.
आपल्या देशा खूप मोठ्या विचारांची परंपरा आहे. खूप पूर्वी बोधायन, भ्रम्हगुप्त, आर्यभट, वराहमीर यांसारख्या अनेक विचारवंतानी गणित, विज्ञान आणि तत्वज्ञानात भर घातली. ज्ञानेश्वर महाराज, गुरु गोविंद सिहं, तुकाराम महाराज, संत नामादेव, संत कबीर यांसारख्या संतानी आमच्या विचारांचा पाया मजबूत आणि प्रगल्भ केला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वराज्याचे स्वप्न दाखवले आणि ते पूर्ण केले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्श्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या विचारवंता सोबत भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारख्या वीरांचा वारसा देखील आपल्या देशाला लाभला आहे.