नमस्कार मित्रांनो, online टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. परंतु या आधी तुम्ही खालील नोट्स वाचू शकता जेणेकरून तुम्हाला टेस्ट देणे सोपे जाईल
दोन चालांतील रेषीय समीकरणे |video – चाचणी – Notes
https://forms.gle/B4YVXbJ3mzb8Y9G88
video
सरावसंच 1.1
सरावसंच 1.2
सरावसंच 1.3
सरावसंच 1.4
सरावसंच 1.5
दोन चलांतील रेषीय समीकरणे.
मित्रांनो या प्रकरणाची सुरुवात करण्यागोदर आपण काही मुलभूत संकल्पनांवर चर्चा करू जेणेकरून या संकल्पनांचा अभ्यास केल्यावर आपणास हे प्रकरणही सोप्पे जाईल. प्रकरणाचे नाव काय आहे आपल्या तर दोन चलांतील रेषीय समीकरणे . यामध्ये चल हा शब्द आलेला आहे. चल म्हणजे काय ते आपण आता समजून घेऊ.
चल, सहगुणक आणि पद
समजा 7x हे एक पद आहे. या पदामध्ये x ला आपण चल म्हणतो या चलाची किंमत नेहमी बदलत राहते. कधीही सारखी नसते हे आपण समजून घ्यायला हवे. आपण इंग्रजी वर्णमालेतील a पासून z पर्यंतच्या कोणत्याही मुळाक्षाराचा वापर आपण चल म्हणून करू शकतो. आता x च्या जोडीला 7 आहेत. या 7 ला x चा सहगुणक म्हणतात. आता या 7 ची किंमत कधीही बदलणार नाही सातच असणार आहे.
समीकरण म्हणजे काय ?
5x + 8 ही एक बहुपदी आहे आणि 5x + 8 = 7 हे एक समीकरण आहे. आता तुम्ही म्हणाल कि पहिली राशी समीकरण का नाही? दिसायला तर सारखी दिसते. तर मित्रांनो पहिल्या राशीत बरोबर चिन्ह नाही तर दुसऱ्या राशीत बरोबर चिन्ह आहे. म्हणजे बरोबर चिन्ह असेल तरच ते समीकरण होते अन्यथा नाही हे लक्षात ठेवा.
दोन चलांतील रेषीय समीकरण म्हणजे काय ?
शब्दांवरून तुम्ही व्याख्या करू शकता. ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते त्या समीकरणाला ‘दोन चालांतील रेषीय समीकरण’ असे म्हणतात. यालाच इंग्रजी मध्ये म्हणतात – linear Equation in two Variable,
उदा. 3x + 2y = 18 किंवा x + y = 5
एकसामयिक रेषीय समीकरणे म्हणजे काय?
जेव्हा आपण दोन चलांतील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्यांना एकसामयिक समीकरणे म्हणतात.