नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023 | JNVST महत्वाच्या व्हिडियो
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023 | JNVST महत्वाच्या व्हिडियो
खालील लिंक वर क्लिक करून आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या व्हिडियो बघू शकता
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा | JNVST | Javahar Navoday Vidyalaya Exam नमस्कार विद्यार्थी मोत्रांनो या प्लेलिस्ट मध्ये आपण इयत्ता सहावी साठी यावर्षी म्हणजे २०२३ रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा (Javahar Navoday Vidyalaya Exam) संदर्भात असणाऱ्या महत्वाच्या व्हिडियो तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.
यात खालील घटकांवर व्हिडियो असतील.
विभाग एक: मानसिक क्षमता चाचणी(40 प्रश्न – 50 गुण) नवोदय प्रवेशपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत ‘मानसिक क्षमता चाचणी’ या विषयात एकूण दहा भाग असतात. या दहा भागांत प्रत्येकी चार चार प्रश्न असून एकूण 40 प्रश्न असतात. हे सर्व प्रश्न केवळ आकृत्यांचे असतात. प्रत्येक भागाकरिता वेगवेगळ्या सूचना असतात. उमेदवारांच्या सुप्त क्षमतांचे मापन करणे हा या चाचणीचा उद्देश असतो.
विभाग दोन अंकगणित (20 प्रश्न – 25 गुण) या प्रश्नपत्रिकेतील ‘अंकगणित’ या विषयावरील प्रश्नांचा उद्देश उमेदवारांच्या अंकगणितातील मूलभूत क्षमता तपासणे, हा आहे. अंकगणित विषयाच्या चाचणीत मुख्यतः आकलन आणि उपयोजन यांच्या संबोधांवर आणि कौशल्यांवर भर देण्यात येतो.
विभाग तीन – भाषा (20 प्रश्न – 25 गुण) या प्रश्नपत्रिकेतील ‘भाषा’ या विषयावरील प्रश्नांचा उद्देश उमेदवारांच्या वाचन- आकलनाचे मापन करणे हा आहे. चाचणीमध्ये चार परिच्छेद असतील. प्रत्येक परिच्छेदाखाली पाच-पाच प्रश्न दिलेले असतील. उमेदवारांनी प्रत्येक परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याच्याखालील प्रश्नांची उत्तरे दयायची आहेत.