१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
अनेक देव तरी देश एक
अनेक जाती तरी देश एक
अनेक धर्म तरी देश एक
अनेक भाषा तरी देश एक
सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्या देशाने स्थान दिले तो देश म्हणजे आपला भारत देश. विविध भाषा, धर्म, पंथ, जाती यांना एका छत्राखाली आणणारा देश म्हणजे भारत. विविधतेतही एकता असलेला देश म्हणजे माझा भारत देश. अशा या भारत देशाचा मला अभिमान आहे.
अनेक वर्षे इंग्रजांच्या गुलामीत असलेला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वीरांना आपले बलिदान द्यावे लागले. भगत सिंग, सुखदेव, राजगुरू अशी कितीतरी नवे आपल्याला सांगता येतील.
न इज्जत दे, न अजमत दे,न सूरत दे, न सीरत दे,
मेरे वतन के वास्ते, ए रब! मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे!
अशा प्रकाराची भावना मनात ठेवून अनके वीरांनी हसता हसता मृत्यूला मिठी मारली. आजही अनेक वीर सीमेवर देशातील नागरिकांच्या रक्षणासाठी आपले प्राण पणाला लावत आहेत.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा प्रवास हा अतिशय खडतरच राहिला. या प्रवासात आपण आपल्या देशाची मोठी प्रगतीही केली. अनेक यशाची उंच शिखरे आपण गाठली. १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. १९४७ – ४८ लाच पहिले भारत पाक युद्ध झाले. २६ जानेवारी १९५० पासून देश राज्यघटनेप्रमाणे चालू लागला. १९५१ – ५२ दरम्यान पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. १९६२ ला भारत चीन युद्ध झाले. १६६५ ला पुन्हा भारत आणि पाक दुसरे युद्ध झाले. १९६८ मध्ये हरित क्रांती झाली. १९७१ मध्ये भारताने पाक चा पराभव केला बंगलादेशची निर्मिती झाली. १९८९ मध्ये मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षावर आणले. १९९० मध्ये देशाने जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचे धोरण आणून देशाच्या प्रगतीला गती दिली. १९९३ मध्ये मुंबई मध्ये बॉम्बस्फोट झाला. १९९९ ला संसदेवर आतंकवाद्यानी हल्ला केला. २००८ मध्ये ताज हॉटेल वर हल्ला झाला. या सगळ्या प्रवासातून आपला देश आज आपण जिथे आहोत तिथपर्यंत पोहचला आहे. अनेक संकटे आली, अनेक अडचणी आल्या परंतु अजूनही आपला देश, देशातील संस्कृती आणि देशातील एकतेला तडा नाही गेला. अजूनही आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत.
न पूछो जमाने को
क्या हमारी कहानी है
हमारी पहचान तो सिर्फ ये हैं
की हम सिर्फ हिंदुस्तानी हैं !
स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं !