इयत्ता दहावी इतिहास | सर्व IMP प्रश्न PDF
इयत्ता दहावी इतिहास | सर्व IMP प्रश्न PDF
नमस्कार मित्रानो आत्तापर्यंत बोर्डाला आलेल्या सर्व महत्वाच्या प्रश्नांच्या PDF खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता.
राज्यशास्त्र
इयत्ता दहावी इतिहास – चुकीची जोडी ओळखा
1) (१) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल -रिझन इन हिस्टरी (मार्च १९ सप्टें. ‘२१ जुलै २२)
(२) लिओपॉल्ड व्हॉन रांके – द थिअरी अॅण्ड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी
(३) हिरोडोटस – द हिस्टरीज
(४) कार्ल मार्क्स -डिसकोर्स ऑन द मेथड
उत्तर : चुकीची जोडी : कार्ल मार्क्स – डिसकोर्स ऑन द मेथड
2) (१) हू वेअर द शूद्राज – वंचितांचा इतिहास (जुलै १९ नोव्हें. ‘२०)
(२) स्त्री-पुरुष तुलना – स्त्रीवादी लेखन
(३) द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स १८५७ – मार्क्सवादी इतिहास
(४) जेम्स ग्रँट डफ – वसाहतवादी इतिहास
उत्तर : चुकीची जोडी द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स १८५७ – मार्क्सवादी इतिहास.
3) (१) कुटियट्टम – केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा (जुलै १९)
(२) रम्मन – पश्चिम बंगालमधील नृत्य
(३) रामलीला – उत्तर भारतातील सादरीकरण
(४) कालबेलिया – राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
उत्तर: चुकीची जोडी – रम्मन – पश्चिम बंगालमधील नृत्य
4) (१) कुतुबमिनार – मेहरौली (मार्च १९)
(२) गोलघुमट – विजापूर
(३) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस – दिल्ली
(४) ताजमहाल – आग्रा
उत्तर : चुकीची जोडी – छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस – दिल्ली.
5) (१) प्रभाकर – आचार्य प्र. के. अत्रे (जुलै १९ – २२ मार्च २०; नोव्हें. ‘२०; सप्टें. २१)
(२) दर्पण – बाळशास्त्री जांभेकर
(३) दीनबंधू. – कृष्णराव भालेकर
(४) केसरी – बाळ गंगाधर टिळक
उत्तर : चुकीची जोडी – प्रभाकर – आचार्य प्र. के. अत्रे.
6) (१) कीचकवध – कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (मार्च १९)
(२) एकच प्याला – राम गणेश गडकरी
(३) इथे ओशाळला मृत्यू – वसंत कानेटकर
(४) नटसम्राट – विजय तेंडुलकर
उत्तर : चुकीची जोडी : नटसम्राट – विजय तेंडुलकर.
7) (१) थोरले माधवराव पेशवे – वि. ज. कीर्तने (जुलै १९)
(२) संगीत शाकुंतल – अण्णासाहेब किर्लोस्कर
(३) संगीत शारदा – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
(४) संगीत मानापमान – कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
उत्तर : चुकीची जोडी : संगीत शारदा – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
8) (१) ऐतिहासिक पर्यटन – ऐतिहासिक वारसा स्मारकस्थळांना भेटी (नोव्हेंबर २०)
(२) नैमित्तिक पर्यटन -फिल्म फेस्टिव्हल, पुस्तक प्रदर्शनाला भेटी
(३) आंतरराष्ट्रीय पर्यटन – थंड हवेच्या ठिकाणांना भेटी
(४) क्रीडा पर्यटन – क्रीडासामने पाहण्यास जाणे
उत्तर : चुकीची जोडी : आंतरराष्ट्रीय पर्यटन – थंड हवेच्या ठिकाणांना भेटी.
9) (१) घारापुरी (एलिफंटा) – लेणी (मार्च १९)
(२) पंढरपूर – देवस्थान
(३) सागरेश्वर – धरण
(४) पाचगणी – थंड हवेचे ठिकाण
उत्तर : चुकीची जोडी : सागरेश्वर धरण
10) (१) महाराज सयाजीराव विद्यापीठ – दिल्ली (सप्टें. ‘२१)
(२) बनारस हिंदू विद्यापीठ -वाराणसी
(३) अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी – अलिगढ
(४) जिवाजी विद्यापीठ – ग्वालियर
उत्तर : चुकीची जोडी: महाराज सयाजीराव विद्यापीठ – दिल्ली.