दहावी मराठी अलंकार
इयत्ता दहावी | महत्वाचे अलंकार | नोट्स आणि विडीयो
अलंकार म्हणजे काय ?
ज्यामुळे भाषेला शोभा येते. तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा आशयार्थ प्रभावी होतो. अशा चित्तवेधक शब्दरचनेला ‘अलंकार’ म्हतात.
अलंकाराचे दोन प्रकार पडतात. एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार
अलंकार समजून घेण्यागोदार उपमेय आणि उपमान म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे.
उपमेय म्हणजे काय?
ज्याची तुलना करायची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे ते म्हणजे उपमेय
उपमान म्हणजे काय?
ज्याच्याशी तुलना करायची आहे तो म्हणजे उपमान
उदाहरण : सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे
यात सुरेशचे अक्षर म्हणजे उपमेय आणि मोती उपमान कारण मोत्याशी सुरेशच्या अक्षराची तुलना केली आहे.
रूपक अलंकार
उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे ते भिन्न नाहीत असे जेथे वर्णन केले जाते तेथे ‘रूपक अलंकार होतो.
उदाहरण :
- नयनकमल उघडीत हलके जागी हो जानकी
- लहान मुल म्हणजे मातीचा गोळा
व्यतिरेक अलंकार
उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जिथे वर्णन केले जाते तेथे व्यतिरेक अलंकार होतो.
उदाहरण :
- अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा ||
- तू माऊली हून मयाळ | चंद्राहून शीतल || पाणीयाहुनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा ||
दृष्टांत अलंकार
एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला दिल्यास ‘दृष्टांत अलंकार’ होतो.
उदाहरण :
- हरिणीचे पाडस | व्याघ्रे धरियले || मजलागी जाहले | तैसे देवा ||
- लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा || ऐरावत रत्न थोर | त्यास अंकुशाचा मार ||
चेतन गुणोक्ती अलंकार
निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात. असे वर्णन जिथे असते तिथे ‘चेतन गुणोक्ती अलंकार’ होतो.
उदाहरण
आला हा दारी उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरी सौंदर्याचे देईल ज्याचे त्याला