इयत्ता दहावी गणित १ – संभाव्यता
इयत्ता दहावी गणित १ – संभाव्यता – Vdieo – Online Test
नमस्कार मित्रांनो, दहावी गणित भाग एक मधील पाचवे प्रकरण संभाव्यता या प्रकरणावरील विडीयोआणि नोट्स पाहणार आहोत. तसेच online परीक्षा सुद्धा तुम्हाला देता येणार आहे.
दहावी गणित भाग 1 संभाव्यता – Video
शक्यता दर्शवण्यासाठी आपण संभवत:, बहुतेक, अशक्य, निश्चित, जवळपास यांसारखे शब्द सुद्धा वापरत असतो. भविष्यातील शक्यता दर्शवण्यासाठी आपण खालील वाक्ये वापरत असतो.
- बहुतेक आजपासून पाऊस पडेल
- महागाई वाढण्याचा संभव खूप आहे
- भारताला पुढील सामन्यात हरवणे खूप कठीण आहे
- निश्चित मी पास होणार
- बालकाला वेळेवर पोलियो डोस दिला पाहिजे, तर त्याला पोलिओ होण्याचा संभव कमी असतो.
यादृश्चिक प्रयोग म्हणजे काय?
ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदर माहित असतात, पण त्यापैकी कोणत्याही फालीताबाबत निश्चित भाकीत आपण करू शकत नाही, सर्व फलिते शक्य असण्याची संभाव्यता समान असते, अशा प्रयोगाला ‘यादृश्चिक प्रयोग’ असे म्हणतात. उदाहरणार्थ – नाणे फेकणे, खेळातील पत्त्यांच्या योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यांमधून एक पत्ता काढणे इत्यादी.