मराठी निबंध : आरशाची आत्मकथा
आजपासून परीक्षा सुरु होणार होती. त्यामुळे सकाळी मी लवकरच उठलो. उठून अंघोळ करून, शाळेचे कपडे घालून आरशासमोर उभा राहिलो. केसांना मस्त तेल लावले आणि केसं विंचरायला सुरुवात केली. आणि अचानक कुठून तरी आवाज आला. काय मित्रा आज पासून परीक्षा सुरु तर मग? मला समजेना आवाज कोण देतय कारण आवाज ओळखीचा नव्हता. पुन्हा आवाज आला आणि आरशाकडे नजर केली. चक्क आरसा आज बोलू लागला होता आणि आवाक होऊन ऐकत होतो. आरशाने जणू आपली कहाणी सुरु केली.
“होय मित्रा मी आरसाच बोलतोय. रोज तू स्वतःला माझ्यात पाहतो. तूच नाही तर सगळी लोकं मला पाहिल्याशिवाय घरातून बाहेरच पडत नाहीत. लहान असो की मोठा. स्त्री असो की परुष. नातू असो कि आजी आजोबा सगळेच माझ्यात स्वतः ला शोधतात. आणि मी स्वतः ला तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात बघत असतो. तुम्ही हवं तेव्हा माझ्यासमोर येऊन स्वत:ला बघू शकता. परंतु मला जर स्वतः ला बघायचं असेल तर खूप वाट बघावी लागती. तुमच्यापैकी कुणी आलं आणि माझ्या बघायला सुरुवात केली कि मग मी त्यावेळी स्वतःचा चा चेहरा तुमच्या डोळ्यांत बघतो.”
“सकाळी सकाळी सगळ्यांची वर्दळ माझ्याकडे लागलेली असते. ऑफिस ला जाणारे तुमचे आई आणि बाबा. शाळेत जाणारे तुम्ही. पण एकदा तुम्ही सगळे आपापल्या कामाला निघून गेले कि मी संपूर्ण घरात एकटाच पडतो. घर एकदम शांत असतं. मी पण एकटा कंटाळून जातो. तुमच्या सगळ्यांच्या घरी परतण्याची वाट बघत. तुम्ही सगळे घरी येता दमून भागून. फ्रेश होता आणि माझ्याजवळ येता तेव्हा कुठे मला बरं वाटतं”
“तसं माझे अनेक भाऊबंद वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. कोणी न्हाव्याच्या दुकानात, कुणी गाडीच्या साईड मिरर मध्ये, कुणी कपड्याच्या दुकानात तर कुणी कुठे कुठे… पण कित्ती प्रकारचे चेहरे आमच्यात डोकावतात. कित्ती चेहरे आम्ही बघतो. लोकांच्या चेहऱ्यावर जर काही डाग असेल तर आम्ही तो दाखवतो. केसं व्यवस्थित नसेल तेही दाखवतो. पण एक खंत आहे – आम्ही तुमचे बाहेरचे रूप दाखवू शकतो परंतु तुमच्या मनातील अंतरंग आम्ही नाही दाखवू शकत”