इयत्ता नववी गणित भाग १
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खालील बटणावर क्लिक करून तुम्ही इयत्ता नववी गणित भाग १ या विषयाच्या व्हिडियो बघू शकता.
इयत्ता नववी गणित भाग १
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खालील बटणावर क्लिक करून तुम्ही इयत्ता नववी गणित भाग १ या विषयाच्या व्हिडियो बघू शकता.
प्रकरण १ – संच (Set)
इतर सर्व प्रकरणाच्या व्हिडियो लवकरच आपल्या या लिंक वर अपडेट करण्यात येतील.
संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत.
(1) यादी पद्धती (Listing method or roster method) या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम देतात. यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते. उदा. 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच यादी पद्धतीने पुढीलप्रमाणे लिहिता येईल. जसे, A = {3, 5, 7, 9} किंवा A = {7, 3, 5, 9} जसे, remember या शब्दातील अक्षरांचा संच {r, e, m, b} असा लिहितात. येथे remember या शब्दात r, m, e ही अक्षरे एकापेक्षा अधिक वेळा आली असली तरी संचात ती एकदाच लिहिली आहेत .
(2) गुणधर्म पद्धती (Rule method or set builder form) या पद्धतीत घटकांची यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्यापुढे उभी रेघ काढतात. उभ्या रेघेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात. उदा. A = {x½x Î N, 1 < x < 10} याचे वाचन संच A चे घटक x असे आहेत की, x ही 1 व 10 च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे, असे करतात.