दहावी इंग्रजी
1.2 An Encounter of a Special Kind
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणावरील सराव चाचणी क्रमांक 2 देण्यासाठी या विडीयो खालील लिंक वर क्लिक करा. परंतु सराव चाचणी सोडवण्याच्या अगोदर या लिंक खाली चाचणीत दिलेल्या उताऱ्याचे मराठी भाषांतर केलेले आहे. ते तुम्ही आधी वाचले तर तुम्हाला सराव चाचणी देताना अडचणी नाही येणार.
https://forms.gle/Vu9dKKGPazGw4STU8
हा अनुवाद आहे –
(पुस्तकातील पान नं. 8 व 9 वरील पुढील उताऱ्याचे भाषांतर – After a hearty lunch, …………………., Adult to survive within its group)
दुपारचं भरपेट जेवण झालं होतं. या दुपारच्या भरपेट जेवणानंतर लेखकाचे आईवडील व लहान बहिणभाऊ वामकुक्षी घेत पडल्या होत्या. लेखक एक गोष्टीचे पुस्तक घेवून निवांत वाचत बसले होते. दुपारचे असे शांत वातावरण कुठल्याही प्रकारची साहसकथा वाचण्यास अतिशय अनुकूल असे होते. त्या शांततेला मध्येच घरच्यांच्या घोरण्यामुळे भंग होत होता. तसेच चिमण्यांचा चिवचिवाट अधूनमधून कावळ्यांचा काव-काव आणि उंचाहून उडत जाणाऱ्या घारीच्या कर्कश अशा आवाजानेही या शांततेचा भंग होत होता. थोड्याच वेळात लेखक पुस्तक वाचण्यात पूर्णपणे बुडून गेले.
अचानक दूरवरून भटक्या कुत्र्यांचा भेसूर भुंकण्याचा आवाज ऐकू आला.एखादे बिचारे दुर्दैवी डुक्कर या कुत्र्यांच्या टोळीच्या तावडीत सापडले असेल असं विचार करून लेखकाने सुरुवातीला या गलक्याकडे दुर्लक्ष केले. मात्र काही वेळातच ती कुत्री अधिक जोराने भुंकू लागली. यातच कावळ्यांच्या कर्कश भीतीदायक अवजाचीही भर पडली. मग तो गलका अधिक जवळ जवळ येतोय याची जाणीव लेखकाला झाली. लेखकाची उस्तुकता शिगेला गेली. पुस्तक बाजूला ठेवून काय बाहेर काय चाललंय हे पाहण्यसाठी लेखक व्हरांड्यात धावले.
क्लब हाऊसच्या छापराकडे नजर टाकली. तिथे त्याला भयंकर काहीतरी दिसले.एक बलशाली वानर जणू तेथील वानरांच्या टोळीचा नेता किंवा लीडर असावा.असा हा बलशाली वानर एका वानराच्या छोट्याशा पिल्लाला पकडून, त्या पिल्लाला जीवे मारण्याच्या इराद्यानेच त्याच्या शरीराचे निर्दयीपणे लचके तोडत होता. चावे घेत होता. त्या लहानश्या पिल्लाची केविलवाणी आई आणि टोळीतले इतर दुर्बल वानर आजूबाजूंच्या इमारतीच्या छपरांवर गोळा होऊन असह्यपणे या पिल्लाचा जीव जाताना पाहत होते. पारण्याच्या जातीतील किंवा जमातीतील मोठा किंवा त्या जमातीचा म्होरक्या असलेला नर वानर शक्यतो दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीत जिवंत राहू देत नाही किंवा जगू देत नाही. अशी एक भयंकर परंपरा आहे,याची लेखकाला आठवण झाली.