Uncategorized

प्रजासत्ताक दिन | Republic Day | गणतंत्र दिन भाषण | गणराज्य दिन

प्रजासत्ताक दिन | Republic Day | गणतंत्र दिन भाषण | गणराज्य दिन

मित्रांनो १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज स्वातंत्र्य मिळून आपल्या देशाला ७५ वर्षे पूर्ण होऊन गेली. या ७५ वर्षांमध्ये आपल्या देशाने मोठी प्रगती केली. भारत आपला देश स्वतंत्र झाला होता परंतु हे स्वतंत्र टिकण्यासाठी एक मजबूत राज्यघटना असणे खूप गरजेचे आहे आणि त्या राज्यघटनेप्रमाणे देशाचा कारभार सुरळीत सुरु राहणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे. देशाची राज्यघटना निर्माण झाली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या  राज्यघटना लिहून पूर्ण झाली. परंतु देशाचा कारभार राज्यघटनेप्रमाणे २६ जानेवारी १९५० या दिवसापासून सुरु झाला आणि आपला देश प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य असलेला बनला.

२६ जानेवारी या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्यदिन संबोधतो. या दिवशी लाल किल्ल्यावर भारताच्या राष्ट्रपतींकडून ध्वजारोहण केले जाते. आपल्या देशात मोठ्या उस्ताहत आणि आनंदात आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. तसं आपला देश १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वतंत्र झाला होता परंतु खऱ्या अर्थाने २६ जानेवारी १९५० रोजी लोकांच्या हातात राज्य आले होते आणि देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या सकारात्मक वाटचालीसाठी राज्यघटना एका उजेड दाखवणाऱ्या दीपस्तंभासारखी उभी होती. म्हणून हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. आजही सीमेवर आपले लाखो सैनिक आपल्या देशाच्या सीमेचे संरक्षण करत आहे. म्हणून आपण प्रजासत्ताक दिन हा दिवस सुट्टीचा नाही तर आपल्या पुढच्या पुढिला या दिवसाचे आणि देशप्रेमाचे महत्व पटवून द्यायला हवे. लोकांमध्ये देशप्रेमाची भावना आपण निर्माण करायला हवी. अशा चांगल्या हेतूने आपण हा दिवस साजरा करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *