नमस्कार विध्यार्थी मित्रांनो
आज तुमच्यासोबत काही पुस्तकांविषयी चर्चा करणार आहे. गणिताच्या अभ्यासाच्या दृष्टीने आणि गणित विषयात आवड निर्माण होण्यासाठी काही उपयुक्त पुस्तकांची नावे मी तुम्च्यासोबर शेअर करणार आहे. तसेच ती पुस्तके तुम्ही कशी मिळवू शकता यावर आपण चर्चाकरणार आहोत.
गणिती – अच्युत गोडबोले
गणिती हे अच्युत गोडबोले याचं अप्रतिम पुस्तक आहे. या पुस्तकात गणिततज्ञांची चरित्रे, त्यांचा गणितांच्या संकल्पनांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास या विषयी अतिशय रंजक तर्हेने मांडणी केली आहे. हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच तुम्हाला गणित विषय आवडायला लागेल. गणिताची सुरुवात नेमकी कुठून कशी झाली? भारतात गणितात कशी प्रगती कशी झाली होती? शून्याचा शोध कसा लागला? पाय्थागोरासाला प्रेमेय कसं सुचलं? यांसारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला मिळतील.
हे पुस्तक online मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
संपूर्ण अंकगणित क्लुप्त्या आणि सूत्रे – पंढरीनाथ राणे
हे पुस्तक सुद्धा खूप छान आहे. स्पर्धा परीक्षा आणि तुमच्या सर्व प्रकारच्या गणिती संकल्पना समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे पुस्तक आहे. हे पुस्तक online मागवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा