इयत्ता आठवी | इतिहास व्हिडियो आणि नोट्स | 8th History Nots and Videos

इयत्ता आठवी | इतिहास व्हिडियो आणि नोट्स | 8th History Nots and Videos | Maharashtra Board

खालील बटणावर क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

(१) इतिहासाच्या साधनांमधील ………. साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

(अ) लिखित                   (ब) मौखिक                   (क) भौतिक                   (ड) दृक्-श्राव्य

(२) पुण्यातील ………. या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.

(अ) आगाखान पॅलेस    (ब) साबरमती आश्रम       (क) सेल्युलर जेल           (ड) लक्ष्मी विलास पॅलेस

(३) विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे ………. होय.

(अ) पोवाडा                   (ब) छायाचित्र                 (क) मुलाखती                 (ड) चित्रपट

२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती.

उत्तर – ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती कारण,

 • स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, दीनबंधू, केसरी, अमृतबझार पत्रिका यांसारखी वृतपत्रे लोकजागृतीची महत्वपूर्ण साधने होती.
 • या वृतापात्रांद्वारे आपल्याला ब्रिटीश सरकारची भारतविषयक धोरणे, त्यांचे भारतावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करता येतो
 • विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी ‘निबंधमाला’ या मासिकातून तसेच लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी ‘प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातूनही विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले आहे.

(२) चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात.

उत्तर – चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात कारण,

 • चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. विसाव्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली.
 • दादासाहेब फाळकेंनी इ.स.१९१३ मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चलेजाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत.
 • या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते.

३. टीपा लिहा.

(१) छायाचित्रे

 • छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक् स्वरूपाची साधने आहेत.
 • छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली.
 • या छायाचित्रांमधून आपणांस व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले, त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते.

(२)वस्तुसंग्रहालये आणि इतिहास

 • इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तुसंग्रहालयांमधून  विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते.
 • पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणांस महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पहावयास मिळतात.

(३) श्राव्य साधने

 • छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे.
 • ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉरस ही इत इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत.
 • आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो.
 • उदा., स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो.