श्री विठ्ठल आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। १ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ.।।
तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी। देव सुरवर नित्य येती भेटी।
गुरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। जय देव ।। २ ।।
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवळिती राजा विठोबा सावळा ।। जय देव ।। ३ ।।
ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव ।। ४ ।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती ।।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ऑवळिती ।।
जय देव जय देव ।। ५ ।।