भारतात कोरोना व्हायरसच्या तीन लसींची चाचणी सुरु आहे.
भारतात कोरोना व्हायरसच्या तीन लसींची चाचणी सुरु आहे. सर्वात आधी कोणती लस मिळणार ?
सर्वात आधी कोणती लस मिळणार ?
भारतात कोरोना व्हायरसच्या तीन लसींची चाचणी सुरु आहे. यातील हैद्राबाद च्या भारत बोयोटेक इंटरनेशनल लि. ची CO – VACCINE आणि अहमदाबादच्या झायडस स्केंडेला कंपनीची झायको – डी या दोन मेड इन इंडिया लसी आहेत. तर oxford च्या लसीची चाचणी सुद्धा भारतात सुरु आहे. पुण्यातील सिरम इंस्टीट्युड या लसीवर काम करत आहे. सध्या आपण सर्वजन कोरोनावरील लस कधी येणार याचीच वाट बघत आहोत.
सध्या जगभरात जवळपास 170 पेक्षा अधिक लसींवर वेगाने काम सुरु आहे. यातील अनेक लसींच्या चाचण्या देखील सुरु झाल्या आहेत. 25 लसींच काम पहिल्या टप्प्यात सुरु असून 13 लसिंवरील काम खूप पुढे सरकले आहे. यात भारतात तयार होणाऱ्या वरील तीन लसींचा देखील समावेश आहे.
या भारतातील 3 पैकी एक लस ही तिसऱ्या टप्प्यात पोहचली आहे. तर उर्वरित दोन लसींच काम हे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आल्याचे दिसून येत आहे. परंतु नेमकी कुठली लस कोणत्या टप्प्यात आहे हे भारतीय आरोग्य मंत्रालयाने अजूनही स्पष्ट केलेले नाही.
तरी मिळालेल्या माहितीनुसार हैद्राबाद च्या भारत बोयोटेक इंटरनेशनल लि. ची CO – VACCINE लस हि पहिल्या टप्प्यात आहे. या लसीच उत्पादन या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला होवू शकते. अहमदाबादच्या झायडस स्केंडेला कंपनीची झायको – डी या लसीवरील दुसरी चाचणी सुरु झाली आहे. तर oxford च्या लसीच ह्युमन ट्रायल भारतात सुरु आहे. या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी साठी परवानगी मिळाली आहे. पुण्यातील सिरम इंस्टीट्युड हि कंपनी oxford ची भारतातील पार्टनर आहे. जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये या लसीवर काम सुरु आहे. या लसीची भारतात मानवी चाचणी सुरूही झाली आहे. देशभरातील जवळपास 1600 जन या चाचणीत सहभागी होणार आहेत. ही लस भारतात सर्वात आधी येण्याची शक्यता आहे.