वाचलेलं लक्षात राहत नाही? काय करायचं? Study Tips
वाचलेलं लक्षात राहत नाही? काय करायचं? Study Tips
नमस्कार मित्रांनो आपल्या प्रत्येकाला वाटत कि मला जीवनात काहीतरी करायचं आहे? मला परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हायचं आहे. मला गणितात पैकी च्या पैकी गुण मिळवायचे आहेत. त्यामुळे मी यावर्षी खूप चांगली तयारी करणार.
अभ्यासाची तयारी करायचं आपण ठरवतो परंतु अभ्यास काही होत नाही कारण वाचलेलं सगळं कसं, डोक्याच्या वरून जात.
आता हा डोक्याच्या वरून जाणारा अभ्यास डोक्याच्या आत कसा जाईल यावर आज आपण चर्चा करूयात.
अभ्यास लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला सहा टिप्स सांगणार आहे.
त्यातली पहिली टिप्स म्हणजे अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. नुसतेच वेळापत्रक बनवू नका त्या वेळापत्रकाप्रमाणे वागा सुद्धा. ते वेळापत्रक फोलो करा. आणि हो तुम्हाला झेपेल असेच वेळापत्रक वानवा.
दुसरी टिप्स आहे नोट्स काढा. वाचताना प्रत्येक मुद्दा नीट समजून घ्या आणि ज्या ज्या महत्वाच्या बाबी किंवा महत्वाचे मुद्दे वाटतात ते एका वहीत लिहून काढा. त्यामुळे जे तुम्ही वाचलेले असेल ते चांगल्याप्रकारे लक्षात राहते आणि परीक्षेच्या काळात उजळणीसाठी म्हणजेच रिव्हिजन साठी तुम्ही काढलेल्या नोट्स महत्वाच्या ठरतात.
तिसरी आणि महत्वाची टिप्स म्हणजे imagination. जे वाचताय त्याची ते Imagine करा. डोळ्यासमोर चित्र आणा. समजा इतिहासाचा एखादा धडा वाचत असाल ज्यात दांडी यात्रा असेल तर अशी कल्पना करा कि दांडी यात्रा तुमच्या डोळ्यासमोर आहे. गांधीजी तुमच्या डोळ्यासमोरून पुढे जात आहे. अशा प्रकारची कल्पना केल्यास कोणतीही संकल्पना आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहण्याची शक्यता असते.
चौथी टिप्स म्हणजे जे वाचताय ते दुसऱ्याला शिकावा. समजून सांगा. मित्रांनो जेव्हा तुम्ही शकलेली किंवा वाचलेली कोणतीही गोष्ट ज्यावेळी दुसऱ्या कोणाला समजून सांगता तेव्हा त्या संकल्पनेची उजळणी होते आणि ती तुमच्या लक्षात राहते.
पाचवी टिप्स आहे वारंवार उजळणी करणे. मित्रांनो आपला मेंदू असा आहे की काही कालांतराने तो अनेक गोष्टी विसरून जातो. मेंदूचा हा गुणधर्मच आहे असे समजा. त्यामुळे आपण केलेल्या अभ्यासाची टप्प्या टप्प्याने उजळणी होणे खूप गरजेची आहे. त्यामुळे अभ्यास करा आणि त्या अभ्यासाची टप्प्या टप्प्याने उजळणनी करा.
आता सहावी आणि महत्वाची टिप्स म्हणजे तक्ते तयार करून घरात लावा. हो मित्रांनी सूत्राने महत्वाच्या व्याख्यांचे तक्ते किंवा आकृत्या काढून तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या जागेवर लाऊ शकता. जेणेकरून या सगळ्या गोष्टी वारंवार तुमच्या समोर राहतील.