दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! बोर्डाने तयार केले App | सर्व प्रश्नपत्रिका App वर
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! बोर्डाने तयार केले App | सर्व प्रश्नपत्रिका App वर
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी App तयार केले आहे. या APP चा विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होईल असे सांगण्यात येत आहे. बोर्ड परीक्षेसंबंधी महत्वाच्या अपडेट या App वर विद्याथ्यांना समजून घेता येतील.
या App ची महत्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
१) बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक:
विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक या app वरून डाउनलोड करता येतील. विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात अनेक शंका असतात. अनेक वेबसाईट वर खोट्या तारखा आणि बनवत वेळापत्रके आपणास बघायला मिळतात. त्यामुळे खरे वेळापत्रक कोणते याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक संभ्रम असतात. हा संभ्रम या App च्या माध्यमातून दूर होईल.
२) जुन्या प्रश्नपत्रिका:
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका शोधणे नेहमी अवघड जाते. इंटरनेट वर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF मिळवणे विद्यार्थ्यांना अवघड जाते परंतु आता App वर विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF पाहता येतील.
३) बोर्ड परीक्षा निकाल:
बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा येथे कळतील तसेच येथेच मुलांना आपला निकाल बघता येईल.
४) नवनवीन अपडेट:
बोर्डाच्या परीक्षेसंबंधी तसेच इतर सर्व महत्वाच्या शैक्षणिक अपडेट इथे मुलांना आणि पालकांना बघता येतील.
App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.mahahsscboard.MSBSHSE