बोर्डाची मोठी अपडेट | परीक्षेसाठी केल्या 23 महत्वाच्या सूचना
बोर्डाची मोठी अपडेट | परीक्षेसाठी केल्या 23 महत्वाच्या सूचना
१ मार्च पासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरु होत आहे या परीक्षेसाठी दहावी आणि बारावीच्या मुलासाठी खालील सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.
उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांकरिता सूचना
1) परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि ओळखपत्र दररोज बरोबर आणावे. पर्यवेक्षक, केंद्रसंचालक व केंद्राला भेट देणारे अधिकारी ज्या ज्या वेळी प्रवेशाची व ओळखपत्राची मागणी करतील त्या प्रत्येक वेळी त्यांना ते दाखविता आले पाहिजे.
2) परीक्षेच्या प्रत्येक पेपरच्या वेळी परीक्षा दालनात परीक्षार्थ्यास पर्यवेक्षकाकडून बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय, बैठक क्रमांक याची खात्री करून उपस्थिती पत्रकावर (Form-1) बैठक कमांक बारकोड स्टिकर कमांक लिहून स्वाक्षरी करावी आणि त्यानंतर बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागेवरच काळजीपूर्वक चिकटवावा.
3) उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर तसेच पुरवणी उत्तरपत्रिकेवर ठराविक रकान्यात बैठक कमांक अंकात व अक्षरात बिनचूक लिहून स्वाक्षरी करावी
4) परीक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर व पर्यवेक्षकाकडे जमा करताना ती सुस्थितीत असल्याची व त्यात सर्व पृष्ठे असल्याची खात्री करून घ्यावी.
5) उत्तरपत्रिकेच्या पृष्ठ क. ३ पासून लिहीण्यास प्रारंभ करावा.
6) उत्तरपत्रिकेच्या पानाच्या दोन्ही बाजूस समान समास सोडू नये केवळ डाव्या बाजूसच समास सोडावा.
7) प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूस लिहावे, उत्तरपत्रिका किंवा पुरवणी उत्तरपत्रिकेचे कोणतेही पान फाडू नये फाडल्यास परीक्षार्थी शिक्षेस पात्र राहील
8) पर्यवेक्षकाकडून घेतलेल्या उत्तरपत्रिकेवर व पुरवण्यावर पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असल्याची खात्री करून घ्यावी तसेच उत्तरपत्रिकेसोबत जोडलेल्या पुरवण्यांची संख्या उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर बिनचूक नोदवावी.
9) प्रश्नपत्रिका मिळताच प्रश्नपत्रिकेच्या वरील भागावर, प्रत्येक पृष्ठावर उजव्या बाजूस स्वतःचा बैठक कमांक नोंदवावा.
फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून विद्यार्थ्यांना नियोजीत वेळेच्या १० मिनीटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची पध्दत बंद करण्यात आली आहे. परंतु विद्यार्थी हित लक्षात घेता सदरची १० मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहेत.
फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून सकाळ सत्रात सकाळी ११००० वाजता तसेच दुपार सत्राात दु. ३००० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. सकाळी ११००० पूर्वी व दुपारी ०३ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिकांचे वितरण होणार नाही. याची दक्षता घेतली जाईल.
10) कच्चे लिखाण करावयाचे झाल्यास ते पेन्सिलनेच आणि उत्तरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पृष्ठभागावरच करावे त्या पृष्ठावर कच्चे लिखाण असा स्पष्ठ उल्लेख असावा. सुटया कागदावर अथवा प्रश्नपत्रिकेवर कच्चे लिखाण करण्यात येऊ नये.
11) संबंधित सेक्शन/प्रश्न/उपप्रश्नाचे उत्तर जेथून सुरू होते तेथेच समासात सेक्शन/प्रश्न/उपप्रश्न क्रमांक अचूक व स्पष्ट लिहावा यासाठी वेगवेगळया शाईचा वापर करू नये.
12) एकाच सेक्शनच्या / प्रश्नाच्या वेगवेगळ्या प्रश्न / उपप्रश्नाकरीता वेगवेगळी पृष्ठे उपयोगात आणू नयेत.
13) परीक्षाध्यनि उत्तराचा काही भाग खोडला असेल अथवा त्याला शाईत बदल करावा लागला असेल अथवा कोरा भाग सोडल्यामुळे त्याठिकाणी निळ्या काळया शाईने रेघ मारली असेल अशा ठिकाणी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी घेऊ नये.
14) परिक्षार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर निळया अथवा काळया शाईचाच वापर करावा अन्यथा मजकुरास गुणदान. केले जाणार नाही.
15) परिक्षार्थ्यांविरूध्द खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव नियमानुसार शिक्षेची कारवाई होऊ शकेल.
अ) पुस्तक, नोट्स, मजकूर असलेला कागद परीक्षा दालनात आणणे, शरीरावर कपडयांवर मजकूर लिहिलेला असणे.
ब) कोणत्याही परीक्षाध्यांशी बोलणे/ संपर्क साधणे / एकटयाने अथवा सामुदायिक कॉपिंग करणे.
क) प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका अथवा उत्तरपत्रिकेतील पाने किंवा पुरवणी परीक्षा कक्षातून बाहेर नेणे.
ड) उत्तरपत्रिका, पुरवणी उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका आदींची अदलाबदल करणे, इतराना देणे घेणे.
इ) केंद्रसंचालक अथवा पर्यवेक्षकाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन न करणे अथवा गैरप्रकार करणे.
16) उत्तरपत्रिकेत /पुरवणीत प्रक्षोभक /असांविधानिक भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्यां देणे, बैठक कमांक/फोन नंबर / भ्रमणध्वणी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास सुचविणे / विनंती करणे याद्वारे स्वतःची ओळख देणे (उदा विशिष्ठ खूण करणे, चिन्ह काढणे नांव, पत्ता लिहिणे, शाळेचे केंद्राचे, गावांचे नाव अथवा अन्य कोणत्याही प्रकारे ओळख पटविणारी बाब) इत्यादी क्ती केल्यास अशा परीक्षार्थ्यांची चौकशी करून संबंधित विषयाची संपादणूक रदद् करण्यात येईल.
17) परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही परीक्षार्थ्यास परीक्षा संपेपर्यंत परीक्षागृहाबाहेर जाता येणार नाही, मात्र अपवादात्मक परिस्थितीत परीक्षागृहाबाहेर जावयाचे असल्यास परीक्षार्थ्यांने प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे जमा करणे आवश्यक आहे.
18) प्रत्येक पेपर संपण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर इशारा घंटा होईल, त्यांनतर विद्यार्थ्यांने उत्तरपत्रिका व पुरवण्यावर काळ्या रंगाचा होलोकाफ्ट स्टिकर सेक्शन प्रत्येकी एक याप्रमाणे दिलेल्या जागेवरच बरोबर चिकटवावा प्रत्येक पेपरच्या शेवटी अंतिम घंटा होईल, अतिम घंटा होताच उत्तरे लिहीणे
थांबवावे आणि मूळ उत्तरपत्रिका व पुरवण्या बरोबर बाधल्याची खात्री करावी. त्याचप्रमाणे मुखपृष्ठावर एकूण पुरवण्याची नोंद करण्यात यावी आणि पर्यवेक्षकाने सर्व उत्तरपत्रिका गोळा करेपर्यंत परीक्षार्थ्यांनी आपले आसन सोडू नये.
19) परीक्षार्थ्यांच्या प्रवेशपत्राचा/ओळखपत्राचा दुरूपयोग जो कोणी परीक्षा काळात करील त्याचे व संबंधित विद्यार्थ्यांचे वर्तन अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा आहे. दोन्ही संबंधिताविरध्द नियमानुसार कारवाई केली जाईल.
20) उत्तरपत्रिकेत स्केच पेनचा वापर करता येणार नाही. आकृत्यांसाठी साध्या पेन्सिलचा वापर करावा. भाषा विषय कृतिपत्रिकामध्ये आकृत्यांसाठी पेनचा वापर करावा.
21) परीक्षार्थ्यांना परीक्षागृहात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक घडयाळ, Pocket Calculator वा तत्सम इलेक्ट्रॉनिक्स् उपकरणांचा वापर करता येणार नाही.
22) मंडळाने दिलेली अधिकृत लॉग टेबल वापरावे व पेपर संपल्यानंतर परत करावे,
23) परीक्षाथ्यांनी परीक्षेसाठी सकाळ सत्रात सकाळी १०.३० वाजता व दुपार सत्रात दुपारी २.३० वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सकाळ सत्रात १०.३० नंतर व दुपार सत्रात २.३० नंतर परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.