43.6 % विद्यार्थी आणि पालकांना वाटते कि बोर्ड परीक्षा रद्द व्हायला हवी
43.6 % विद्यार्थी आणि पालकांना वाटते कि बोर्ड परीक्षा रद्द व्हायला हवी | तुम्हाला काय वाटतंय?
यावर्षीच्या लॉकडाऊनमुळे शाळा अजूनही सुरु होवू शकल्या नाहीत. इतक्यातच नवे शैक्षणिक धोरण सरकारने नुकतेच जाहीर केले. या शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे महत्व खूप कमी होईल असे सांगितले जाते. काही न्यूज chanel ने तर अशा बातम्या दिल्या होता कि दहावी आणि बारावी बोर्ड रद्द होणार. यामुळे समाजाच्या विविध स्थरावर उलट सुलट चर्चा सुरु झाली होती. काही लोकांना वाटलं होतं कि यावर्षी ची बोर्डाची परीक्षा रद्द होईल. तर तसं होणार नाही. यावर्षी ची बोर्ड परीक्षा रद्द नाही होणार.
परंतु नव्या शैक्षणिक धोरणानुसार हि परीक्षा रद्द होईल कि नाही हा विचार नंतर करू. पुढे काय होईल हे कोण सांगणार? परंतु आपण एक सर्वे केला यात एक प्रश्न विचारण्यात आला होता की दहावी बोर्ड परीक्षा रद्द व्हावी की नाही. यात जवळपास 43.6% लोकांचे मत होते कि हि परीक्षा नको. परंतु 51.9% लोकांना परीक्षा असावी असच वाटतय आणि 4.4 % लोकं अजूनही तटस्थ आहेत.
या सर्वेक्षणात जास्तीत जास्त सहभाग हा विद्यार्थ्यांचा होता. जवळपास 87.4 % विध्यार्थी, 4.9% पालक, 4.9% शिक्षक तर 5.2% इतर लोकांचा समावेश होता. तुम्हाला काय वाटतंय यावर तुमचे मतही तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून नोंदवू शकताय?
https://www.mahendraghare.in/2020/08/sscboardexampol.html