दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च मध्येच | बोर्डाकडून वेळापत्रक तयार
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022 फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार
दरवर्षी इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होत असतात. इयत्ता दहावीची परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर बारावीची परीक्षा ही फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होत असते याचप्रमाणे यावर्षीही इयत्ता दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा 2022 ही फेब्रुवारी आणि मार्चमध्येच होणार असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीचे वेळापत्रक तयार केले आहे आणि मंजुरीसाठी राज्य सरकार कडे पाठवले आहे. लवकरच या वेळापत्रकाला मंजुरी मिळाल्यास बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक आपल्याला बघायला मिळेल.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षी जशा होतात तशाच होणार आहेत
लेखी परीक्षेआधी शाळा स्तरावर अंतर्गत मूल्यमापन होईल
लेखी परीक्षेचे गुण – परीक्षेचा कालावधी पूर्वीप्रमाणेच असणार आहे.
या परीक्षा होत असताना कोरानाचे नियम काटेकोरपणे पार पाडले जातील.