दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तीर्णतेचा निकष ३५ वरून २५ वर येण्याची शक्यता?
दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तीर्णतेचा निकष ३५ वरून २५ वर येण्याची शक्यता?
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांचे नियोजन करण्यासाठी राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य परीक्षा नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे हे सुद्धा आहेत. सध्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तीर्णतेचा निकष ३५ वरून २५ वर आणण्यावर या समितीकडून गांभीर्याने विचार प्रक्रिया करणे सुरु आहे.
दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारी आणि मार्च मध्ये होत असतात. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी बारावीची परीक्षा २३ एप्रिल तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे. याबाबतचे नियोजन ठरवण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने राज्य परीक्षा नियोजन समिती स्थापन केली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 30 लाखांच्या घरात असल्यामुळे ही परीक्षा सध्यातरी online घेणे कठीण आहे. त्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ही ऑफलाईन होईल असेही स्पष्ट करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वाभूवर या नियोजन समितीकडून वेळोवेळी मंडळाला योग्य त्या सूचना देण्यात येणार आहेत. या सूचनांचा विचार करून मंडळाला बोर्डाच्या परीक्षांचे नियोजन करता येईल असे दिसून येते.
दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तीर्णतेचा निकष ३५ वरून २५ वर आणावा सअशी शिफारस मुख्याध्यापक संघटनेने केलेली आहे. अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने आहे त्या अध्यापनावर विध्यार्थी पास होणे कठीण आहे त्यामुळे ही शिफारस केली आहे असे सांगण्यात येते आणि नियोजन समिती सुद्धा या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत आहे. परंतु अजूनपर्यंत या मुद्द्यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
तसेच अनेक बऱ्याच सूचना आणि शिफारशी विद्यार्थी, पालक विविध शिक्षक संघटनांकडून या समितीला येत आहे. योग्य त्या मुद्द्यावर नियोजन समिती नक्कीच विचार करून तशा सूचना मंडळाकडे देईल. परंतु अंतिम निर्णय मंडळ घेईल असेही दिसून येते.