SSC English – A Teenager’s Prayer | Test and Marathi Translation
या कवितेवरील टेस्ट देण्यासाठी या विडीयोखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. परंतु टेस्ट देण्यापूर्वी तुम्ही कवितेचे मराठीतील भाषांतर वाचू शकता. जेणेकरून तुम्हाला टेस्ट देणे सोप्पे जाईल.
SSC English – A Teenager’s Prayer | Test and Marathi Translation
या कवितेवरील टेस्ट देण्यासाठी या विडीयोखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. परंतु टेस्ट देण्यापूर्वी तुम्ही कवितेचे मराठीतील भाषांतर वाचू शकता. जेणेकरून तुम्हाला टेस्ट देणे सोप्पे जाईल.
https://forms.gle/suYH85bLspoQ14HK6
SSC English – A Teenager’s Prayer – मराठी अनुवाद
मित्रांनो या कवितेतील Teenage या शब्दाचा अर्थ आपण समजून घेणे गरजेचे आहे. Teenage म्हणजे काय तर असे वय कि जे 13 ते 19 या वयाच्या दरम्यान येते. एकंदरीत आपल्या मराठी भाषेत अशा मुलांना आपण किशोरवयीन मुले असेही म्हणतो. अशा किशोरवयीन मुलांनी देवाकडे केलेली प्रार्थना आपल्यला या कवितेच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे. कवी म्हणतो कि, प्रयेक दिवसाची सुरुवात नव्याने होत असते. आणि या दिवसात काय काय करायचं आहे याचा संपूर्ण निर्णय मला घ्यायचा आहे. मला कोणत्या मार्गाने जायचं आहे किंवा मला कोणता मार्ग निवडायचा आहे याचा निर्णय पूर्णपणे मलाच घ्यायचा आहे किंवा निर्णय मी घेणार आहे. मी असाही मार्ग निवडू शकतो कि जो मला खूप मोठ्या यशाकडे घेवून जाऊ शकतो. किंवा मी निवडलेला मार्ग अंधारमय असू शकतो जो मला खूप मोठ्या दु:खाकडेही नेणारा असू शकतो. देवा कृपया माझे डोळे उघडे ठेव किंवा उघडे असुदे. मला सगळं काही स्पष्ट दिसुदे. जे खर आहे त्याच्या बाजूने उभ राहायचं बाल मला दे. माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी होवूदे. देवा मला मदत कर. नाही म्हणण्यासाठी. माझ्या मार्गात मोह आला तर त्या नाही म्हणण्याची ताकद माझ्यात दे. माझं शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेव देवा. जेव्हा माझं किशोरवय संपलेले असेल आणि मी मोठा झालेलो असेल. माझ्या डोळ्यासमोर दिसतंय कि मी माझं आयुष्य खूप मस्त जगलोय कारण तू माझ्या सोबत होतास आणि आजही आहे.