2022
2022 बोर्ड परीक्षा सुरु झाल्यावर मुलांना कोणते नियम पाळावे लागतील?
- परीक्षा सुरु होण्यापूर्वी एक दिवस अगोदर विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर ज्या ठिकाणी आपल्या परीक्षेची बैठक व्यवस्था केलेली असेल तेथे जाऊन त्याची खात्री करून घ्यावी.
- परीक्षा सुरु होण्यापूर्वी थर्मल स्कॅन्निंग साठी परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास अगोदर उपस्थित राहावे व प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या 30 मिनिटे अगोदर स्थानापन्न व्हावे.
- परीक्षा सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे इशाऱ्याची घंटा होईल तसेच प्रत्येक सत्र संपण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर इशाऱ्याची घंटा होईल. विद्यार्थ्यांनी अंतिम घंटेनंतर लिहिणे थांबवावे. पर्यवेक्षकांनी सर्व उत्तरपत्रिका गोळा करेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले आसन सोडू नये.
- परीक्षार्थी खालीलपैकी कोणत्याही कारणाने करावाइस पात्र राहील. अ) पुस्तक, वही, कच्चे काम केलेला कागद किंवा त्यासाठीचा कागद, मोबाईल, digital घड्याळ किंवा इतर इलेक्ट्रिक उपकरण इ. जवळ बागळल्यास ब) परीक्षेदरम्यान इतर परीक्षार्थ्यांशी बोलल्यास अथवा संपर्क केल्यास क)उत्तरपत्रिका व पुरवणी स्वतःबरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यास ड) केंद्रसंचालक / उपकेंद्रसंचालक / पर्यवेक्षक यांनी केलेल्या सूचनांचे पालन न केल्यास
- परीक्षार्थ्याला परीक्षेच्या काळात परीक्षाकक्ष सोडून बाहेर जाता येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत परीक्षाकक्षातून बाहेर पडण्याची परवानगी दिल्यास उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रीक्षा पर्यावेक्षाकाकडे जमा करावी लागेल.
- परीक्षेदरम्यान एखाद्या विद्यार्थ्यास कोविड – 19 विषाणूच्या अनुषंगाने काही त्रास होत असल्यास पर्यवेक्षक / उपकेंद्रसंचालक / केंद्र संचालक यांच्या निदर्शनास आणून द्यावे.