दहावी बोर्ड परीक्षा २०२१ प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा प्रकल्प यांसाठी मार्गदर्शक सूचना
दहावी बोर्ड परीक्षा २०२१ प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा प्रकल्प यांसाठी मार्गदर्शक सूचना
1. अ) कोविड – १९ विषाणूच्या पाश्वभूमीवर इयत्ता दहावी विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा मंडळाच्या प्रचलित पद्धतीने घेतली जाणार नाही. त्याऐवजी प्रात्यक्षिकांवर आधारित विशिष्ट लेखन कार्य, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही व गृहपाठ यांचा समावेश असेल. सदरचे प्रात्यक्षिकांवर आधारित कार्य लेखी परीक्षेनंतर दिनांक २१ मे २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत सादर करण्यात यावेत. प्रात्यक्षिक वही जमा करण्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यास कोविड – १९ विषाणूची लागण झाली असल्यास अथवा त्रास होत असल्यास प्रात्यक्षिक वही जमा करण्यास आणखी १५ दिवसांपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल.
ब) श्रेणी, तोंडी परीक्षा व इतर अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित माध्यमिक शाळांना देण्यात येत आहे.
क) यासाठी अंतर्गत व बहिस्थ परीक्षक संबंधित माध्यमिक शाळांतूनच देण्यात येतील.
2. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्याशिक्षण / शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक २१ मे ते ०१ जून २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. कोविड – १९ विषाणूच्या पाश्वभूमीवर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी दिनांक १० जून पर्यंत वाढविण्यात येईल. दिव्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी प्रात्यक्षिकांवर आधारित विशेष लेखन कार्याद्वारे मूल्यमापन करण्यात येईल. याबाबतीत संबंधित शाळेला स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
3. शाळेत येणाऱ्या सर्व घटकांनी कोविड – १९ विषाणूच्या प्रदुर्भावाच्या अनुषंगाने शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.
4. उपरोक्त कालावधीत शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व सेनिटायझरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तथापि, अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी शाळेत येताना स्वतः ची पाण्याची बाटली व सेनिटायझरची छोटी बाटली सोबत ठेवावी. तसेच स्वतःचा मास्क व लेखन साहित्य सुद्धा स्वतःसोबत आणणे व वापर करणे आवश्यक राहील.
5. कोविड – १९ विषाणूच्या पाश्वभूमीवर विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण तणाव कमी करण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी पालक यांना वारंवार येणाऱ्या शंकांची उत्तरे राज्यमंडळाच्या संकेतस्थळावर प्रश्नउत्तरांच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
6. प्रात्यक्षिक वही शाळेमध्ये जमा करताना विद्यार्थ्यांनी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आरोग्यविषयक सर्व सूचनांचे पालन करावे. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना त्याचे तापमान घेण्यात येईल तसेच त्यांना टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात येईल. शाळेमध्ये प्रवेश करताना व शाळेतील संपूर्ण कालावधीत मास्क वापरणे अनिवार्य राहील.
7. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी सेनिटायझरचा वापर करावा. शाळेमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारीरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. प्रात्यक्षिक वही जमा केल्यावर विद्यार्थ्यांनी त्वरित शाळेचे आवार सोडावे.