शिक्षक दिन
शिक्षक दिन – मराठी भाषण – निबंध
कोणीतरी म्हंटल आहे,
शिक्षक और सडक दोनो एक जैसे होते है |
खुद जहा है वही रहते है |
मगर दुसरो को उनकी मंजिल तक पहुंचा सकते है |
अशा आपल्या श्रेष्ठ शिक्षकांसाठी आपण दरवर्षी आपल्या भारत देशात 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा करत असतो. आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान आणि भावी पिढीकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शिक्षकांविषयी प्रचंड आदर आणि प्रेम होते. म्हणून 1962 सालपासून त्यांचा जन्मदिवस म्हणजे राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म मद्रास जवळील तीरुराणी या गावात एका ब्राम्हण घरात झाला. म्हणून लहान पानापासून ते धार्मिक वातावरणातच वाढले. मोठे झाले. धार्मिक विचारांचा पगडा त्यांच्या जीवनावर पडला. matric पास झाल्यावर त्यांनी पुढे तत्वज्ञान या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रास मधील एका महाविद्यालयात नोकरी केली. ते एक आदर्श शिक्षक म्हणून जगले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होते. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व असल्याने परदेशातही त्यांच्याकडे आदराने पाहीले जात होते.
मित्रांनो आपण पाहिलं कि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आता आपण आपल्या आजच्या शिक्षक म्हणजे काय याचा नेमका अर्थ जाणून घेवूयात.
शि – शिखर तक ले जानेवाला
क्ष – क्षमा कि भावना रखने वाला
क – कमजोरी दूर करने वाला
म्हणजे विद्यार्थ्यांच्या चुका माफ करून त्या सुधारून त्यांना शिखरावर नेण्याचे काम जो करतो तो शिक्षक. आजही अनेक शिक्षक मोठ्या तळमळीने आपल्या विद्यार्थ्यांना घडवत आहेत. शिक्षक हा कोणत्याही राष्ट्राचा पाया असतो. समाजाला घडवण्याचे काम हे शिक्षकांवरच असते. कारण प्रत्येक नवी पिढी ही सुरुवातीला शिक्षकांच्या हाताखालून तयार होऊन पुढे समाजात वावरत असते. मानून जितका आपला शिक्षक प्रगल्भ, हुशार, मेहनती तितकीच या देशाची पिढी प्रगल्भ, हुशार, मेहनती होते आणि देशाचा विकास झपाट्याने होतो. शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते सांगणारी कुसुमाग्रज यांची एक कविता सांगतो आणि थांबतो
कणा – मराठी कविता
ओळखलत का सर मला पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलाला वरती पाहून,
गंगामाई आली पाहुनी, गेली घरट्यात राहून,
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाइल कशी बायको मात्र वाचली,
भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले,
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.