पाकचा बॉलर म्हणाला “मला एक तरी सिक्सर मारून दाखव” सचिन ने काय धुलाई केली बघा!
पाकचा बॉलर म्हणाला “मला एक तरी सिक्सर मारून दाखव” सचिन ने काय धुलाई केली बघा!
तारीख 16 डिसेंबर १९८९, ठिकाण पेशावर – पाकिस्तान, भारत पाकिस्तान क्रिकेट सामना. धावसंखेचा पाठलाग करताना भारताचे ३ फलंदाज तंबूत परतले होते. पराजय तर नक्कीच होता. अशातच मैदानावर फलंदाजी करायला आला एक 16 वर्षाचा मुलगा – सचिन रमेश तेंडुलकर. ज्याचा डेब्यू काही दिवसांपूर्वीच झाला होता. हा तोच मुलगा होता ज्याच्या चेहऱ्यावर वखार युनिस चा चेंडू लागला होता आणि संपूर्ण चेहरा रक्तबंबाळ झाला होता, तरीही मैदानाच्या बाहेर जाण्याच्या ऐवजी याच्या तोंडून शब्द आले होते – ‘मै खेलुंगा!’ असा हा सचिन रमेश तेंडूलकर मैदानात फलंदाजी करायला आला आणि आल्या आल्या मुश्ताक अली च्या गोलंदाजीवर दोन खरखरीत षटकार खेचून त्याचे स्वागत केले. तेव्हा एक पाकिस्तानी गोलंदाज सचिन च्या समोर आला आणि म्हणाला. ‘दम है तो मुझे छक्के मार के दिखा.” कोण होता हा सचिन ला challenge देणारा? हा challenge देणारा कोणी ऐरागैरा नव्हता तर पाकिस्तानचा लीजेंड्री लेगस्पिनर ‘अब्दुल कादिर’ ज्याच्या गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांना पाणी पाजले होते. ज्याला फिरकीचा जादुगार शेन वार्न सुद्धा आपला गुरु मनात होता. जो एकाच चेंडूला पाच वेगवेगळ्या पद्धतीने स्पिन करू शकत होता. पण या आव्हानानंतर जे काही झाले ते भारताच्या इतिहासात एखाद्या सोनेरी क्षणाप्रमाणे आहे.
हा किस्सा आहे १९८९ मधला. भारतीय संघ क्रिकेट सामन्याच्या मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये गेले होता. १६ डिसेंबर ला भारतीय संघ एकदिवसीय म्हणजे one day सामना खेळण्यास पेशावर पोहचला. परंतु सामना सुरु होण्याच्या आधीच पावसाने हजेरी लावली. मुसळधार पाऊस पडत होता. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता आणि सामना रद्द होण्याच्या मार्गावर होता. शेवटी पावसाने एकदाची मेहरबानी दाखवली आणि बळीराजाने विश्रांती घेतली. परंतु तरीही 50 शतकांचा सामना होणे शक्य नव्हते. शेवटी हा सामना 20 – 20 षटकांचा खेळला जावा असे दोन्ही संघांकडून ठरवण्यात आले आणि सामना सुरु झाला.
भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तान ला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भोपळा न फोडताच सईद अन्वर ला तंबूचा रस्ता दाखवला. परंतु हा आनंद फार काळ भारतीय संघाच्या चेहऱ्यावर फार काळ टिकून राहिला नाही कारण दुसऱ्या विकेटसाठी पाकिस्तान कडून 134 धावांची marathon भागीदारी झाली. पाकिस्तान संघाने पहिली फलंदाची करताना 20 व्या शतकाच्या शेवटी १५७ धावा स्कोरबोर्ड वर लावल्या आणि भारताला १५८ धावांचे मोठे आव्हाहन दिले. आता या १५८ धावा १९८९ सालातल्या, २०२४ चा विचार केला तर आत्ता त्या २५० च्या वर होतील.
याच १५८ धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. ६० धावांपर्यंत एकही विकेट गेली नव्हती. परंतु ६४ धावांवर पहिला गडी बाद झाला. आणि त्या पाठोपाठ आणखी दोन गडी बाद होऊन भारताची धावसंख्या ८८ वर ३ अशी झाली. आता विजयासाठी चार ओव्हरमध्ये हव्या होत्या ७९ धावा आणि मैदानात होते कर्णधार के. श्रीकांत आणि सचिन तेंडूलकर. हे लक्ष त्या काळात अशक्य होते. भारतीय टीम ने तर अशाच सोडली होती. पराजय तर नक्कीच आहे पण चला आता match मध्ये सराव तरी करू.
पण आपला सचिन कुठे ऐकणार. सचिन काही हार मानायला तयार नव्हता. सामना खेळायचा तर विजय मिळवण्यासाठीच आणि सुरुवातच मुश्ताक अली ला दोन षटकार खेचून केली. यानंतर लालभडक झालेला पाकिस्तानचा आघाडीचा लेगस्पिनर अब्दुल कादिर’ सचिन च्या समोर आला आणि म्हणाला ‘हिम्मत असेल तर मला एक तरी षटकार मारून दाखव’ सचिन काहीच बोलला नाही फक्त अब्दुल कादिर ची गोलंदाजी येण्याची वाट बघत होता. शेवटी तो क्षण आला. आता गोलंदाजीला अब्दुल कादिर आणि समोर स्ट्राईक वर सचिन. अब्दुल कादिर च्या हातून पहिला चेंडू निघाला आणि थेट लेग स्टंप च्या दिशेने परंतु सचिनने पुढे येऊन या चेंडूवर एक फटका मारला आणि चेंडू काही टप्पे खात चेंडू डीप मिडविकेट च्या हातात गेला. चेंडू परत येईपर्यंत दोन धावा धावल्या गेल्या. दुसरा चेंडू पुन्हा त्याच दिशेने आला सचिनने long on च्या दिशेने एक उंच फटका मारला आणि चेंडू थेट सीमारेषेपलीकडे षटकार! हा षटकार अब्दुल कादिर आणि संपूर्ण पाकिस्तान टीमला एक चांगलीच चापरख देऊन गेले. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा काही पावले पुढे येऊन सचिने डीप मिडविकेटच्या वरून पुन्हा एक षटकार ठोकला. आता मात्र अब्दुल कादिर ला दिवसा तारे दिसायला लागले. हा मुलगा काही आपण समजतो तितका साधारण नाही हे त्याच्या लक्षात आला. त्यामुळे आता अब्दुल कादिर ने चेंडू थेट ऑफ स्टंप च्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि long ऑफ च्या दिशेने तिसरा षटकार खेचून सचिनने आपण खरच साधारण नाही हे स्पष्ट केले. पाचव्या चेंडूवर एक चौकार आणि शेवटच्या चेंडूवर तीन धावा काढून या संपूर्ण शतकात अब्दुल कादिर कडून तब्बल २७ धावा वसूल केल्या. भारत हा सामना फक्त चार धावांनी हरला परंतु लक्षात राहिले ते अब्दुल कादिर ला लावलेले तीन षटकार आणि १८ चेंडूत ५३ धावा.. सामना हरलो पण सचिन जिकला !