प्रणब मुखर्जी – माहिती मराठीतून
भरताचे तेरावे राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्याबद्दल आपण जाणून घेवूयात. प्रणब मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील बंगाली कुटुंबात 13 डिसेंबर 1935 साली झाला होता.. त्यांचे वडील कामदा मुखर्जी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय होते. प्रणब मुखर्जी यांना पाईप पिण्याची सवय होती. ही त्यांची सवय इंदिरा गांधी यांना आवडत नसे. प्रणब मुखर्जी यांना अनेक गोष्टी खूप गोपनीय ठेवण्याची सवय होती. प्रणब मुखजी यांना कॉंग्रेस चे संकटमोचक असेही म्हणत.
पंतप्रधान पद सोडले तर प्रणबदा यांनी अनेक मोठी पदे भूषवली होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ते पुढे होते. परंतु राजीव गांधी यांनी या पदाचा पदभार स्वीकारला. 2012 ते 2017 या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते. कॉंग्रेस चे मोठे नेते होते प्रणब मुखर्जी. कॉंग्रेसची सत्ता असताना मंत्रिमंडळातील अनेक मोठी पदे त्यांनी भूषवली होती. 2009 ते 2012 या काळात त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद होते. तसेच संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, लोकसभा पक्ष नेते अशी अनेक मोठी पदे त्यांनी भूषवली होती. 2019 मध्ये त्यांना भारताचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
1969 मध्ये त्यांना इंदिरा गांधी यांनी कॉंग्रेस च्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून येण्यास मदत केली तेव्हा त्यांच्या राजकीय जीवनाला खऱ्या अर्थ्याने सुरुवात झाली. इंदिरा गांधींच्या मात्रीमंडळात महत्वाचे नेते होते. 1982 – 1984 या काळातही ते भारतचे अर्थमंत्री होते. 1980 ते 85 या काळात ते राज्यसभेत नेते होते.
३१ सप्टेंबर 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला.