Parts Of Speech – शब्दांच्या जाती
नमस्कार मित्रांनो, इंग्रजी व्याकरणात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे शब्दांच्या जाती. शब्दांच्या एकूण ८ जाती आहेत. कोणत्याही भाषेचा मुलभूत भाग म्हणजे ‘शब्दांच्या जाती’. या शब्दांच्या जाती खालीलप्रमाणे आहेत.
Parts Of Speech – शब्दांच्या जाती
नमस्कार मित्रांनो, इंग्रजी व्याकरणात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे शब्दांच्या जाती. शब्दांच्या एकूण ८ जाती आहेत. कोणत्याही भाषेचा मुलभूत भाग म्हणजे ‘शब्दांच्या जाती’. या शब्दांच्या जाती खालीलप्रमाणे आहेत.
Noun (नाम)
‘नाम’ म्हणजे नाव. कोणत्याही वस्तूच, स्थळाच, कल्पनेच नाव. आपण आजूबाजूला अनेक गोष्टी बघत असतो. अनेक वस्तू हाताळत असतो. त्या वस्तूला आपण ज्या शब्दाने हाक मारतो. त्यालाच नाम असे म्हतात.
उदाहरण – table, ball, boy, India, Pen, Cricket, Mahatma Gandhi
Pronoun (सर्वनाम)
नामाची पुनारार्वृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे ‘सर्वनाम’ होय.
उदाहरण – He, she, it
Verb (क्रियापद)
क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. ज्या शब्दातून क्रिया व्यक्त होते त्या शब्दास क्रियापद असे आपण म्हणू शकतो.
उदाहरण – Go, come, play, write, run
Adverb (क्रियाविशेषण)
जो शब्द क्रियेविषयी अधिक माहिती सांगतो त्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. जसे ‘सचिन वेगाने धावतो’ या वाक्यात वेगाने हा शब्द धावणे या क्रीयापादाविषयी अधिक माहिती संगत आहे. (Sachin runs fast)
उदाहरण – Fast, slow, upward, very
Preposition (शब्दयोगी अव्यय)
शब्दयोगी अव्यय म्हणजे संबंध दर्शवणारा शब्द. जो शब्द नावापूर्वी वापरला जातो आणि पोटवाक्याशी संबंध दर्शवतो अशा शब्दाला ‘शब्दयोगी अव्यय’ म्हतात.
उदाहरण – into, on, for, up, down, below
Conjunction (उभयान्वयी अव्यय)
जो शब्द दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडणाऱ्या शब्दाला ‘उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात.
उदाहरण – and, or, but, so, because
Interjection (केवलप्रयोगी अव्यय)
जे शब्द उद्गारार्थी शब्द असतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण – Alas!, Ouch!, Superb! etc.