तुम्हाला काय वाटतंय? परीक्षा ऑनलाईन असावी की ऑफलाईन तुमचे मत नोंदवा खालील लिंक वर.
ऑफलाईन परीक्षाच विद्यार्थी हिताच्या – डॉ. वसंत काळपांडे यांचे मत – तुम्हाला काय वाटतय? तुमचे मत इथे नोंदवा.
नमस्कार मित्रानो आपल्या महारष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बोर्डाच्या परीक्षा या ऑफलाईनच होणार असे सांगितले. यानंतर अनेक विद्यार्थी, ‘अभ्यास ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का?’ असा सवाल विचारात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या पाश्वभूमीवर शिक्षणतज्ञ आणि महारष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे यांनीही आपले मत मांडले. आज लोकसत्ता पेपर ला त्याचा लेख वाचला. यात त्यांनी स्पष्ट म्हंटले आहे की, ‘ऑफलाईन परीक्षाच विद्यार्थी हिताच्या असतील’ यासंदर्भात बोलताना त्यांनी खालील मुद्दे सांगितल.
सध्या काही मुठभर लोकं ऑनलाईन परीक्षांसाठी आग्रह धरत आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नाही.
विद्यापीठांच्या परीक्षांचा अनुभव खूप वाईट आणि असमाधानकारक आहे. कारण विद्यापीठाच्या परीक्षा ज्यावेळेस online घेतल्या तेव्हा अनेक अडचणी आल्या होत्या.
इतर अनेक परीक्षांच्या तुलनेत दहावी आणि बारावीमधील विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार केला टर ती संख्या खूप मोठी आहे. जपास 30 लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत.
ही परीक्षा खूप खर्चिक असते.
ऑनलाईन परीक्षा घेण्यापूर्वी सखोल अभ्यास काटेकोर नियोजन आणि भरपूर पूर्वतयारीची गरज असते. ऑनलाईन परीक्षेसाठी ही वेळ नक्कीच योग्य नव्हती.