पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं twitter account आणि website hack
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक ट्विटर अकाउंट आणि संकेतस्थळ नुकतेच hack करण्यात आले आहे. या ट्विटर अकाउंट वर hackers ने मेसेज फोरवर्ड करून लोकांकडून कोरोना रिलीफ फंडासाठी डोनेशन म्हणून बीटकॉइन ची मागणी केली. परंतु एक तासानंतर या ट्वीट ला त्वरित डिलीट करण्यात आले.
narendramodi_in या नावाने नरेंद्र मोदी यांचे ट्विटर account असून हे वेबसाईट आणि मोबाईल app सोबत जोडले गेलेले आहे. या ट्विटर अकाउंट वर एका पाठोपाठ एक असे अनेक ट्विट करण्यात आले होते. यात मुख्यकरून कोरोना रिलीफ फंडासाठी डोनेशन म्हणून बीटकॉइन ची मागणी केली होती. यातील पहिला ट्विट मध्यरात्री 3.09 मिनिटांनी करण्यात आला होता. यानंतर सुद्धा डोनेशन साठी काही ट्विट hackers च्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या अकाउंट वर पोस्ट करण्यात आले होते.
सकाळी जवळपास 4 च्या दरम्यान hackers च्या माध्यमातून करण्यात आलेल्या या पोस्ट डिलीट करण्यात आल्या. या account ला जॉन विक द्वारा hack करण्यात आले होते.
मागील काही मागील काही महिन्यांपूर्वी बराक ओबामा आणि इतर काही व्यक्तींचे ट्विटर account hack करण्यात आले होते.