मराठी व्याकरण समास
मराठी व्याकरण समास
भाषेचा विचार करताना आपण बऱ्याचदा शब्दांची काटकसर करत असतो. दोन किंवा अधिक शब्द बऱ्याचदा आपण एकत्र करतो. जसे चंद्राचा उदय झाला असे म्हणताना आपण चंद्रोदय झाला असे आपण म्हणतो. बटाटा घालून केलेला वडा म्हणजे ‘बटाटावडा’. अशाप्रकारे शब्दांच्या एकत्रीपाणाला आपण समास असे म्हणतो. ‘सम – अस’ या शब्दापासून समास या शब्दाची उत्पत्ती झाली. समास म्हणजे एकत्र येणे. तसेच शब्दांच्या एकत्रीकरणाने तयार केलेला जोडशब्द म्हणजे ‘सामासिक शब्द’ होय. सामासिक शब्द कोणत्या जोडशब्दापासून तयार झालेला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण फोड करून सांगतो. अशी फोड करून दाखवण्याची पद्धत म्हणजे विग्रह होय.
उदा. 1) सामासिक शब्द – वनभोजन आणि त्याचा विग्रह – वनातील भोजन
तसेच विग्रह म्हणजे सामासिक शब्दांचे कमीत कमीत शब्दांत केलेले स्पष्टीकरण. सामासिक शब्दांत कमीत कमी 2 पदे किंवा दोन शब्द एकत्र येतात. यातील कोणत्या पदाला अधिक महत्व आहे यावरून समासाचे चार प्रकार ठरवण्यात आलेले आहेत.
पहिले पद | दुसरे पद | समासाचा प्रकार |
प्रधान | गौण | अव्ययीभाव समास |
गौण | प्रधान | तत्पुरुष समास |
प्रधान | प्रधान | द्वंद्वं समास |
गौण | गौण | बहुव्रीही समास |
1) अव्ययीभाव समास
या समासात पहिले पद प्रधान असून शक्यतो हे पहिले पद अव्यय असते. या शब्दाचा वापर क्रीविशेषणासारखा होतो. उदा. आजन्म, प्रतिदिन, आमरण
2) तत्पुरुष समास
या समासात दुसरे पद प्रधान असून या समासाचे विभक्ती तत्पुरुष आणि द्विगू तत्पुरुष असे दोन उपप्रकार आहेत.
अ) विभक्ती तत्पुरुष समास – येथे शब्दांमधील विभक्ती प्रत्येय गाळलेले असते. उदा. 1) तोंडपाठ 2) क्रीडांगण
ब) द्विगू तत्पुरुष समास – या समासात पहिले पद हे संख्याविशेषण असते उदा. 1) त्रिभुवन 2) चौकोन 3) त्रिकोण
3) द्वंद्वं समास
या समासात दोन्ही पदे प्रधान असतात. उदा. आईवडील
या समासाचे इतरेतर द्वंद्वं समास आणि वैकल्पिक द्वंद्वं समास असे दोन प्रकार पडतात.
अ) इतरेतर द्वंद्वं समास – या समासाचा विग्रह करताना आणि / व या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग होतो
उदा. 1) आईवडील – आई आणि वडील
ब) वैकल्पिक द्वंद्वं समास – या समासाचा विग्रह करताना किंवा / अथवा या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग होतो.
उदा. 1) खरेखोटे – खरे किंवा खोटे 2) बरेवाईट – बरे किंवा वाईट
4) समाहार द्वंद्वं समास
ज्या समासातील शब्दांत अनेक गोष्टींचा समावेश होतो. ज्यांचा विग्रह करताना वैगरे, इतर यांसारख्या शब्दांचा वापर होतो अशा समासाला समाहार द्वंद्वं समास असे म्हणतात.