इयत्ता दहावी – विषय मराठी – जाहिरातलेखन
इयत्ता दहावी – विषय मराठी – जाहिरातलेखन
जाहिरात लेखन करताना खालील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.
जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो आणि कोणत्याही संवादाचे महत्त्वाचे माध्यम भाषा हेच असते. या दृष्टीने जाहिरात लेखनात भाषा ही पुढीलप्रमाणे महत्त्वाची ठरते.
(१) कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे सूत्र आहे.
(२) जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी लक्षवेधी शब्दरचना असावी.
(३) कशाची जाहिरात आहे हे ठळकपणे व आकर्षकपणे नमूद करावे.
(४) आलंकारिक, काव्यमय, प्रभावी शब्दांचा वापर करून जाहिरात अधिक आकर्षक करावी.
(५) जाहिराती तयार करताना समर्पक व लक्षवेधी भाषेला महत्त्व असावे.
(६) ग्राहकांची बदलती आवड, सवयी, फॅशन्स व गरज यांचे प्रतिबिंब जाहिरातीत दिसावे.
(७) जाहिरातीमधून उत्पादनाची गुणवत्ता प्रकर्षाने जाणवली पाहिजे.
(८) जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक (मोबाईल नंबर, ई-मेल आयडी) यांचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.
* कृतिपत्रिकेमध्ये –
(१) जाहिरात पेनने लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये.
(२) चित्र काढण्याची आवश्यकता नाही.
जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती
- शब्दांवरून जाहिरात लेखन.
- जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे.
- विषय देऊन जाहिरात लेखन.
- दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे.