दहावी बारावीचा निकाल कसा आणि कुठं बघायचा? SSC HSC Result Date 2024
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल यंदा लवकर लागण्याची शक्यता आहे.
दहावी बारावीचा निकाल कसा आणि कुठं बघायचा? SSC HSC Result Date 2024
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल यंदा लवकर लागण्याची शक्यता आहे.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ मार्च ला मराठीच्या पेपर ने सुरु झाली होती ते २६ मार्च ला भूगोल पेपर ने संपली. दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यावर्षी बोर्डाची परीक्षा दिली होती. गेल्या काही दिवसांपासून दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाची चर्चा सुरू झाली आहे. त्यातून समाजमाध्यमांमध्ये निकालाच्या तारखा फिरत असल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल २० मेनंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी जाहीर केला जाणार याबाबत उत्सुकता आहे.
मागील वर्षीचा विचार केला तर इयत्ता बारावीचा निकाल २५ मे तर इयत्ता दहावीचा निकाल २ जून रोजी लावण्यात आला होता.
इयत्ता बारावीचा निकाल खालील लिंक वर पाहावा
Link 1 – https://mahresult.nic.in/mbhsc2023/mbhsc2023.htm
Link 2 – https://hscresult.mkcl.org/
इयत्ता दहावीचा निकाल खालील लिंक वर पाहावा
Link 1 – https://mahresult.nic.in/
Link 2 – https://sscresult.mkcl.org/
निकाल कसा बघायचा?
पायरी 1: सर्वात आधी आपल्या बैठक क्रमान टाईप करावा.
पायरी 2 : आईचे नाव टाईप करावे
पायरी 3: View Result वर क्लिक करावे.
पायरी 4 : निकालाचा स्क्रीनशॉट घ्यावा.