इयत्ता दहावी मराठी – उपयोजित लेखन
खालील बटनांवर क्लिक करून तुम्ही इयत्ता दहावी साठी असलेल्या उपयोजित लेखन प्रकारांच्या महत्वाच्या नोट्स पाहू शकता
नमस्कार मित्रांनो यावर्षी दहावीला उपयोजित लेखन या विभागामध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे.
दैनंदिन व्यवहारात आपले विचार, कल्पना, भावना व अनुभव लेखनातून मांडणे फार महत्त्वाचे असते. इतरांशी संवाद साधण्यासाठी, स्वत:ला आविष्कृत करण्यासाठी लेखनाची गरज असते. विविध कार्यालयांत अनेक निमित्ताने आपल्याला अर्ज करावे लागतात. आप्त, मित्रांशी औपचारिक पत्रव्यवहार करावा लागतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमांचा प्रभाव सर्वदूर पोहोचला, तरी लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम वृत्तपत्र आहे.
वृत्तपत्रांमधून विविध प्रकारचे लेखन केले जाते. त्यातील महत्त्वाचे लेखन म्हणजे बातमी लेखन. याबरोबरच तुम्हांला निबंध, जाहिरात, सारांश, कथा यांसाठी लागणारी लेखन कौशल्येविकसित करायची आहेत. ही कला आपणाला या वयापासूनच ज्ञात झाली, तर भविष्यात त्याचाउपयोग होऊ शकतो. आपण प्राप्त केलेल्या ज्या लेखन कौशल्याचा उपयोग लेखनाच्या विविध अंगाने व व्यावहारिक जीवनासाठी करता येतो किंवा केला जातो त्यास उपयोजित लेखन म्हणतात.